चोरटी वाळू वाहतुक केल्याप्रकरणी एकास अटक

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी अवैध्य व्यवसायिकांविरोधात उघडलेली मोहिम वेगाने सुरू असुन रविवारी जामखेड पोलिसांच्या विशेष पथकाने वाळूतस्करी करणार्या एका टँक्टरवर कारवाई केली. या कारवाईत एक ब्रास शासकीय वाळू व ट्रॅक्टर ( MH 16 BZ3053 ) असा तीन लाख 15 हजाराचा मुद्देमाल जामखेड पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई जामखेड शहरातील मोरेेेेवस्ती भागातील संताजीनगर – शिवाजीनगर रोडवरील भागात करण्यात आली. ट्रॅक्टर चालक लक्ष्मण शामराव सदाफुले रा भुतवडा याने ट्रॅक्टर मालकाचे नाव सांगण्यास नकार दिला. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत.