दोन लाख रूपये किंमतीचे गहाळ मोबाईल शोधण्यात जामखेड पोलिसांना यश, मोबाईलधारकांना मोबाईल केले परत

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड पोलिस स्टेशन हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलच्या शोधासाठी असलेल्या मोहिमेस मोठे यश येताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दोन लाख रूपये किंमतीचे मोबाईल शोधल्यानंतर आता आणखीन दोन लाख रूपये किंमतीचे मोबाईल शोधण्यात जामखेड पोलिसांना यश आले आहे.

जामखेड पोलिस स्टेशन हद्दीतून  गेल्या 2 ते 3 महिन्यापासून गहाळ झालेले 9 मोबाईल मिळवण्यात जामखेड पोलिसांना यश आले. जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने मोबाईल धारकांना त्यांचे मोबाईल आज परत करण्यात आले.

गहाळ झालेल्या मोबाईलमध्ये सॅमसंग ,रियल मी, रेडमी ,ओप्पो ,विवो अशा विविध कंपन्यांचे 9 मोबाईल होते. या नऊ मोबाईलची किंमत अंदाजे 1.5 ते 2 लाखापर्यंत आहे.

या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पी एस आय राजू थोरात पोलिस हेड कॉन्स्टेबल संंजय लाटे, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस कॉन्स्टेबल आबा आवारे, विजय कोळी, दत्तू बेलेकर,अरुण पवार, संग्राम जाधव, संदीप राऊत, संदीप आजबे, सायबर विभागाचे प्रशांत राठोड व मोबाईल धारक उपस्थित होते. यावेेळी मोबाईल धारकांच्या वतीने जामखेड पोलीस स्टेशन व अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानत नागरिकांकडून सत्कार करण्यात आला.

पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, पोलीस कॉन्स्टेबल आबा आवारे व पोलीस कॉन्स्टेबल दत्तु बेेलेकर आणि मोबाईल सेलचे प्रशांत राठोड यांनी गहाळ मोबाईल शोधण्याची कामगिरी केली.