जामखेड पोलिसांचे (Jamkhed police) धाडसत्र (Raids) सुरूच;अवैध्य दारू विक्री करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हे दाखल

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: अवैध्य दारू विक्री करणारांविरोधात जामखेड पोलिसांचे छापासत्र सुरूच असुन शनिवारी सायंकाळी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिसांच्या विशेष पथकाने शहरातील दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीत तब्बल 15 हजार रूपये किमतीचा अवैध्य दारूचा साठा हस्तगत करण्यात यश मिळवले. ( Jamkhed police raids continue; Crimes filed against two persons selling illegal liquor) याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

जामखेड पोलिसांची (Jamkhed Police) धडक कारवाई सुरू

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड (PI Sambhajirao Gaikwad) यांना गुप्तबातमीदाराकडून शहरातील खर्डा रोडवरील बोराटेवस्ती परिसरात अवैध्य दारूची विक्री ( illegal liquor selling) केली जात असल्याची माहिती मिळाली होती.  त्यानुसार डिबी पथकाने टाकलेल्या धाडीत सुमारे 13 हजार 440 रूपयांची विदेशी दारूचा साठा हस्तगत करण्यात जामखेड पोलिसांना यश आले. पो काॅ विजयकुमार कोळी यांच्या फिर्यादीवरून  मिलिंद महादेव काळे रा तेलंगशी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शहरातील नगररोडवरील हाॅटेल देशी तडका ( Hotel Desi Tadaka) या ठिकाणी छापा टाकत सुमारे 17हजार 740 रूपयाची अवैध्य दारू हस्तगत केली. पो काॅ  संदिप राऊत यांच्या फिर्यादीवरून सचिन निवृत्ती बारगजे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईच्या पथकात हेड काँस्टेबल बापु गव्हाणे, पो ना रमेश फुलमाळी,  पो काॅ विजयकुमार कोळी, आबासाहेब आवारे, संदिप आजबे, संदिप राऊत, अरूण पवार, अविनाश ढेरे, शिवलिंग लोंढे सह आदींचा समावेश होता. पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत