धक्कादायक : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीची आत्महत्या, जामखेडमध्ये उडाली खळबळ

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : इंजिनिअरिंगला शिकत असलेल्या एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जामखेड शहरातून उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. (Shocking, engineering student committed suicide by hanging herself with rope excitement in Jamkhed)

जामखेड शहरातील रसाळ नगर भागातील नुराणी बेकरी जवळ रहाणाऱ्या साक्षी दिलीप भोसले (वय 20) या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीने रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत साक्षी भोसले ही पुण्यात शिक्षणास होती. सध्या ती इंजिनिअरिंग शाखेत शिक्षण घेत होती. ती जामखेड येथिल नागेश विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक दिलीप भोसले यांची मुलगी होती.रविवार दि 17 जुलै 2022 रोजी सायंकाळी सातच्या वाजण्याच्या सुमारास साक्षी भोसले ही घरात एकटी होती.

त्याचवेळी साक्षीने घरातील छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटूंबियांनी तीला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतू डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले.

त्यानंतर मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. रात्री उशिरा डॉ शशांक शिंदे यांनी मयताचे शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

तिच्यावर पाटोदा तालुक्यातील घुमरा पारगाव या मुळगावी 18 रोजी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. साक्षी हिच्या जाण्याने जामखेड तालूक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मयत साक्षी हिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जामखेड पोलिस पुढील तपास करत आहेत.