धक्कादायक : प्रेम प्रकरणातून शिक्षिकेचा मृत्यू; आरोपी शिक्षक पती-पत्नी विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कोपरगाव येथे कार्यरत विवाहित शिक्षिकेचे जामखेडमध्ये राहणाऱ्या एका विवाहित शिक्षकावर प्रेम जडले. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. लग्नाचाही फैसला झाला. पण अचानक माशी शिंकली आणि प्रियकर शिक्षकाकडून लग्नास नकार देण्यात आला. मग काय शिक्षिकेने जामखेड गाठले. जामखेडला येताच तिने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचार झाले. शिक्षिका ठिक झाली. पण महिन्यानंतर पुन्हा तिची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रियकर शिक्षक आणि त्याच्या पत्नीविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shocking, teacher's death due to love affair, accused teacher husband wife case registered at Jamkhed police station, jamkhed news today

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत शिक्षिका संतुकाबाई वाघुजी भिसे (वय 34) ह्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एका माध्यमिक शाळेत कार्यरत होत्या.12 वर्षापुर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना दोन मुले होती. गेल्या चार वर्षांपासून मयत शिक्षिकेचे आपल्या पतीशी पटत नसल्याने त्या वेगळ्या राहत होत्या. याच काळात त्यांची जामखेड शहरात राहणाऱ्या परमेश्वर बोडखे या शिक्षिकाशी ओळख झाली. मयत शिक्षिका आणि बोडखे यांची जुनी ओळख होती.

दरम्यान, 9 जूलै 2022 रोजी प्रियसी शिक्षिकेने प्रियकर शिक्षकाची भेट घेण्यासाठी जामखेड गाठले. मयत शिक्षिकेने प्रियकराच्या घरी जाऊन विष प्राशन केले. त्यानंतर प्रियकर आणि त्याच्या पत्नीने तिला जामखेडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती प्रियसीच्या आईला प्रियकर शिक्षकाने कळवली.

घटनेची माहिती मिळताच मयत शिक्षिकेची आई तातडीने जामखेडला दाखल झाली. त्यानंतर मयत शिक्षकेला पुढील उपचारासाठी नांदेडमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर मयत शिक्षिकेला घरी सोडण्यात आले होते. मात्र महिनाभरानंतर त्या शिक्षिकेला पुन्हा त्रास होऊ लागला होता. नांदेडमधील रूग्णालयात उपचार सुरू असतानाच तिचा 9 सप्टेंबर 2022 रोजी मृत्यू झाला.

आरोपी शिक्षक परमेश्वर धर्माजी बोडखे आणि मालुबाई परमेश्वर बोडखे यांचं कुटुंब नांदेडच्या हातगाव तालुक्यातील सावरगाव येथील आहे. बोडखे हे जामखेड शेजारील पाटोदा येथे नौकरी होते. तर जामखेड शहरातील शिक्षक काॅलनी परिसरात ते राहत होते.