ग्रामपंचायत निवडणुक : जामखेड पोलिसांनी टाकल्या 11 हाॅटेलवर धाडी (Gram Panchayat elections: Jamkhed police raids 11 hotels)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : सध्या जामखेड तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकी पार पडत आहेत. या निवडणुका शांततेत व निर्भय वातावरणात पार पडाव्यात यासाठी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी आता कंबर कसली आहे. निवडणूक काळात येणारा दारुचा महापूर रोखण्यासाठी जामखेड पोलिसांनी संपुर्ण तालुक्यात धाडसत्र हाती घेतले आहे. (Gram Panchayat elections: Jamkhed police raids 11 hotels )
जामखेड पोलिसांच्या पथकाने काल रात्री उशीरापर्यंत व आज जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरातील हॉटेल रोहितराजे, हॉटेल बळीराजे, हॉटेल कन्हैया, हॉटेल रंगोली, हॉटेल प्रताप ,हॉटेल अजिंक्यतारा ,हॉटेल रंगोली हॉटेल शिवशाही, हॉटेल तुळजाई , हॉटेल रुद्रा अश्या 11 हॉटेल वर धाडी टाकत सुमारे 61 हजार रूपये किमतीचा अवैध देशी देशी दारूचे साठे जप्त करण्याची धडाकेबाज कारवाई केली आहे. (Gram Panchayat elections: Jamkhed police raids 11 hotels) हि कारवाई पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकरा जणांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमन कायद्यान्वये स्वतंत्र 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड व सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर यांच्या नेतृत्वाखाली हेड काँस्टेबल नवनाथ भिताडे, पोलिस काँस्टेबल विजयकुमार कोळी, अविनाश ढेरे, संदीप आजबे, अरुण पवार, सचिन जाधव यांच्या पथकाने केली.