जामखेड : ही लढाई कार्यकर्त्यांसाठी, तुमचा एक दिवस माझ्यासाठी द्या, 364 दिवस मी तुमच्या सेवेसाठी तत्पर – आमदार प्रा. राम शिंदे यांचे मतदारांना अवाहन

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। आपला कार्यकर्ता दिलेले आदेश पाळेल हा विश्वास नेत्याला असला पाहिजे. कार्यकर्त्याला देखील वाटलं पाहिजे की, आपला नेता आपल्या हिताचाच निर्णय घेईल.हा विश्वास असला पाहिजे. त्यामुळे तत्वाशी कुठेही तडजोड होता कामा नये. बाजार समिती निवडणुकीची लढाई ही कार्यकर्त्यांसाठी आहे. कार्यकर्त्यांसाठी वाट्टेल ते करणार म्हणजे करणार. तुमचा एक दिवस माझ्यासाठी द्या, 364 दिवस मी तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल, असा मतदारांना विश्वास देत जामखेड बाजार समिती निवडणुकीत जामखेड तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलच्या सर्व 18 उमेदवारांना बहुमताने निवडून द्या, असे अवाहन आमदार प्रा.राम शिंदे यांनी केले.

Jamkhed, give me your one day, 364 days I will be ready to serve you, MLA Ram Shinde appeal to voters, Jamkhed Market Committee Election 2023

जामखेड बाजार समिती निवडणूकीच्या प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. या निवडणुकीत भाजप विरूध्द राष्ट्रवादी असा थेट सामना रंगला आहे. भाजप व मित्रपक्ष यांनी जामखेड तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. साकत गटातील शिऊर येथे या पॅनलची प्रचारसभा पार पडली.यावेळी आमदार प्रा.राम शिंदे बोलत होते.

सभेच्या अध्यक्षस्थानी ॲड विश्वास निकम पाटील होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ, माजी सभापती भगवान मुरुमकर, सोमनाथ पाचरणे, पांडुरंग उबाळे, लहू शिंदे, प्रविणशेठ चोरडिया, मनोज कुलकर्णी, जमीर बारूद, बाजीराव गोपाळघरे, महारूद्र महारनवर, मनोज राजगुरू, उदय पवार, आप्पासाहेब ढगे, बाप्पू माने सह सर्व 18 उमेदवार यावेळी उपस्थित होते.

Jamkhed, give me your one day, 364 days I will be ready to serve you, MLA Ram Shinde appeal to voters, Jamkhed Market Committee Election 2023

यावेळी पुढे बोलताना आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले की, बाजार समिती निवडणुकीला उमेदवारी मिळावी अशी अनेकांनी आपल्याकडे इच्छा व्यक्त केली होती.परंतू अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवशी सर्व उमेदवारांची बैठक घेतली. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर उरलेल्या सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे असं जाहीर केलं होतं. त्यानुसार घडलही. परंतू फाॅर्म भरल्यानंतर मुलाखती असा नवीनच पायंडा विरोधकांकडून आणला गेला. त्याच बैठकीत फाॅर्म मागे घ्यायच्या अर्जावर उमेदवारांच्या सह्या घेतल्या गेल्या. म्हणजे नेत्याचा ना कार्यकर्त्यांवर विश्वास, ना कार्यकर्त्यांचा नेत्यावर विश्वास, असे वातावरण विरोधकांचे आहे, असे म्हणत विरोधकांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवत आमदार शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

Jamkhed, give me your one day, 364 days I will be ready to serve you, MLA Ram Shinde appeal to voters, Jamkhed Market Committee Election 2023

आमदार प्रा राम शिंदे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी लढवायच्या आणि ही लढवल्यावर आमदार व्हायचं, मी तर तुमच्या आधी आमदार झालोय, पाच वर्षाचा सोडून सहा वर्षाचा आमदार झालोय, बाजार समितीच्या पुढच्या निवडणुकीतही मीच आमदार असणार आहे. कार्यकर्त्यांनी 94 हजार मतदान केलयं, हरलो म्हणून काय झाल? दमदारयं, विश्वासयं, तुम्हीच तर 94 हजार मतदान केलयं, एवढी मोठी शक्ती आली तरी 10 हजार मतदान वाढलं, 2019 ला कार्यकर्त्यांनी एकनिष्ठ भूमिका घेऊन पक्षाचं काम केलं. पण सगळी बनवाबनवी, अश्वासनांची खैरात, कुठलचं काही पुर्ण झालं नाही, सगळ्या तालुक्याने ओळखलयं, ह्यांच्या निवडणुकीला तडजोड, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी विरोधकांमध्ये कसा आनंदी आनंद होता, अशी उपहासात्मक टीका करत विरोधकांमधल्या नाराजीनाट्यावर शिंदे यांनी भाष्य केले.

शिंदे पुढे म्हणाले की, मी कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढवतो, परंतू विरोधक कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून स्वता:चाच विचार करतात. 2019 ला आम्हाला सोडून गेलेल्यांची आज काय अवस्था आहे. किंगमेकर असणार गावात पॅनल उभे करू शकले नाहीत. त्यांची अवस्था ना घर का – ना घाट का अशी झालीय.लोकं म्हणली राम शिंदे संपला आता हरळच उगवणार, पण अडीच वर्षात माघारी आलो, चेष्टा नाही, इथं ग्रामपंचायतीला उमेदवारी द्यायची म्हणलं की, लोक म्हणत्येत तुझ्या भावकीत, नात्यात किती मतदान आहे. काम दाखवलं की नाही मुंबईला जाऊन. माझी चिंता करू नका, मला तुमची चिंताय, असे म्हणत कार्यकर्त्यांसाठी बाजार समितीच्या निवडणूकीत मोठ्या ताकदीने उतरलो असल्याचे शिंदे यांनी ठणकावून सांगितले.

यावेळी तालुकाध्यक्ष अजय काशिद, प्रा सचिन गायवळ, भगवान मुरुमकर, सचिन घुमरे, शरद भोरे, गौत्तम उत्तेकर यांची भाषणे झाली. यावेळी पार पडलेल्या प्रचार सभेसाठी साकत गटातील सर्व गावांमधील सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक सह आदी मतदार उपस्थित होते.