Collector orders to start bull market | शेतकर्‍यांसाठी खुशखबर : जामखेडचा बैल बाजार सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Collector orders to start bull market | कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेला जामखेडचा जनावरांचा आठवडे बाजार सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.यामुळे आता शेतकऱ्यांना पशुधन खरेदी विक्रीचा मार्ग खुला झाला आहे. जामखेडचा आठवडे बाजारात सुरू व्हावा अशी मागणी सातत्याने होत होती. ती मागणी आता मार्गी लागली आहे. बाजार सुरू करण्यासंबंधीचे आदेश अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बाजार समित्यांना दिले आहेत.

अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या आवारात भरणारे जनावरांचे आठवडे बाजार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. तसा आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून आला आहे.जनावरांचे आठवडे बाजार कोरोना प्रतिबंधात्‍मक नियमांचे काटेकोर पालन करून भरवण्यात येणार आहेत.कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता बाजार समिती व्यवस्थापनाला घ्यावी लागणार आहे असे आदेशात म्हटले आहे.

जामखेड बाजार समितीच्या आवारात दर शनिवारी भरणारा जनावरांचा बाजार आता तब्बल दोन वर्षानंतर (04 सप्टेंबर पासुन) शनिवारपासून पुन्हा सुरू होणार आहेत. येथील बैल बाजार राज्यात प्रसिध्द आहे. बाजार पुन्हा सुरू होणार असल्याने बळीराजा सुखावला आहे. आता तालुक्यासह शेजारील तालुक्यातील शेतकऱ्यांना शेळ्या, बैल, गाय, म्हैस खरेदी विक्री करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी जारी केलेला आदेश खालील प्रमाणे : (Collector orders to start bull market)

Collector orders to start bull market
Collector orders to start bull market

 

Collector orders to start bull market
Collector orders to start bull market

 

web title: Collector orders to start bull market