Jamkhed Market Committee election 2023 : आमदार प्रा.राम शिंदे यांनी केली 16 उमेदवारांची घोषणा, भाजपकडून कोणाला मिळाली उमेदवारी ? वाचा सविस्तर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत (Jamkhed Market committee election 2023) भारतीय जनता पार्टीने आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर निवडणूकीस सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आमदार प्रा.राम शिंदे यांनी भारतीय जनता पार्टी प्रणित जामखेड तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास (bjp Swabhimani Shetkari Vikas Panel) पॅनलच्या 16 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. (MLA Ram Shinde announced 16 bjp candidates list )

जामखेड बाजार समितीची 18 जागांसाठी निवडणुक होत आहे. या निवडणुकीत कोणाची कोणासोबत युती – आघाडी होणार? याकडे जामखेड तालुक्याचे लक्ष लागले होते. भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून 40 पेक्षा जास्त इच्छूक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवार अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून 16 उमेदवारांच्या नावाची घोषणा आमदार प्रा राम शिंदे यांनी केली आहे. व्यापारी मतदारसंघातील 2 नावांची घोषणा काही वेळातच होणार आहे.अशी माहिती समोर आली आहे.

जामखेड बाजार समिती निवडणूकीसाठी भाजपने जाहीर केलेले उमेदवार खालीलप्रमाणे

सोसायटी मतदारसंघ – सर्वसाधारण

1) सचिन नवनाथ घुमरे
2) गौतम महादेव उत्तेकर
3) गणेश आजिनाथ लटके
4) तुषार बाबासाहेब पवार
5) विष्णू शामराव भोंडवे
6) मच्छिंद्र गिते
7) जालिंदर दत्तात्रय चव्हाण

सोसायटी मतदारसंघ  – महिला राखीव मतदारसंघ

1) सुरेखा राजेंद्र शिंदे
2) शारदा शरद भोरे

सोसायटी मतदारसंघ  – इतर मागास प्रवर्ग

1)  डाॅ गणेश दादासाहेब जगताप

सोसायटी मतदारसंघ – विमुक्त जाती भटक्या

1) अशोक महादेव महारनवर

ग्रामपंचायत मतदारसंघ  –  सर्वसाधारण

1) शरद पंडित कार्ले
2) वैजीनाथ पोपटराव पाटील

ग्रामपंचायत मतदारसंघ – आर्थिक दुर्बल घटक

1) नंदकुमार प्रकाश गोरे

ग्रामपंचायत मतदारसंघ – अनुसूचित जाती जमाती

1) डाॅ सिताराम चिमाजी ससाणे

व्यापारी / आडते मतदारसंघ

घोषणा बाकी

हमाल / मापाडी मतदारसंघ

1) रविंद्र शिवराम हुलगुंडे