ब्रेकिंग: शेतकरी विकास आघाडीची विजयाकडे वाटचाल

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्याचे लक्ष लागलेल्या जवळा सोसायटी निवडणूकीच्या निकालाचे प्राथमिक कल हाती आले असून शेतकरी विकास आघाडीची विजयाकडे वाटचाल सुरू आहे.

मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरू झाली. पहिल्या तासाभरात शेतकरी विकास आघाडीने 200 मतांची आघाडी घेतली आहे, शेतकरी विकास आघाडीची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. अंतिम निकाल लवकरच जाहीर होणार आहेत.

शेतकरी विकास आघाडीच्या नेत्यांनी आणि समर्थकांनी विजयोत्सव साजरा केला आहे, फटाक्यांची आतषबाजी आणि विजयी घोषणांनी जवळा परिसर दणाणून गेला आहे.