शेतकरी विकास आघाडीचा  विजय निश्चित : नय्यूमभाई शेख

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । जवळा सोसायटी निवडणुकीत शेतकरी विकास आघाडीचा विजय निश्चित आहे, विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका असे अवाहन ग्रामपंचायत सदस्य नय्यूमभाई शेख यांनी मतदारांना केले आहे.

आमदार रोहित पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या नय्यूमभाई शेख म्हणाले की, शेतकरी विकास आघाडीचा विजय निश्चित आहे, अति करणारांची माती होणार हे जवळेकरांनी खूप वेळा पाहिले आहे, 17 रोजी याचा पुन्हा प्रत्यय सर्वांना येणार आहे. विरोधकांचा पत्ता गुल होणार हे निश्चित आहे. त्यामुळे मतदारांनी सजग राहून शेतकरी विकास आघाडीला भरघोस मतांनी विजयी करावे असे अवाहन शेख यांनी केले आहे.