जवळा सोसायटी निकाल : शेतकरी विकास आघाडीचा दणदणीत विजय !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । अतिशय चुरशीच्या वातावरणात पार पडलेल्या जवळा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल हाती आले असून या निवडणुकीत शेतकरी विकास आघाडीने शेतकरी ग्रामविकास आघाडीचा मोठ्या फरकाने पराभव करत दणदणीत विजय संपादन केला आणि गड राखला. शेतकरी विकास आघाडीने सर्व 13 जागांवर दिमाखदार विजय संपादन केला.

जवळा सोसायटीच्या 13 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात होते. शेतकरी विकास आघाडी विरूध्द शेतकरी ग्रामविकास पॅनल या दोन गटांत काट्याची टक्कर झाली. यात शेतकरी विकास आघाडीने बाजी मारली. या निवडणुकीत मातब्बर नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या.

जवळा सोसायटीसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले, या निवडणुकीसाठी एकुण 1667 मतदारांपैकी 1503 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदान संपल्यानंतर लगेच काही वेळानंतर जवळा जिल्हा परिषद शाळेत मतमोजणी पार पडली.

या निवडणुकीत शेतकरी ग्रामविकास आघाडीने बाजी मारत विजय संपादन केला. सर्वच्या सर्व 13 जागांवर शेतकरी विकास आघाडीने दिमाखदार विजय संपादन केला, दीडशे ते 200 मतांच्या फरकाने शेतकरी विकास आघाडीने विजय मिळवला आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर तर सहाय्यक म्हणून निलेशकुमार मुंढे यांनी काम पाहिले. मतमोजणी प्रक्रियेसाठी 30 कर्मचाऱ्यांनी काम पाहिले, मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जामखेड पोलिस दलाच्या टीमने चोख बंदोबस्त ठेवला होता, निवडणूक शांततेत पार पडली.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात