- Advertisement -

वृक्षारोपण करत वाढदिवस साजरा: अनुरागचा उपक्रम (Celebrating birthday by planting trees: Anurag’s initiative)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : सध्या तरूणाईमध्ये वाढदिवसाची मोठी क्रेझ आहे. वाढदिवस आला रे आला की सोशल मिडीयावर वेगवेगळे स्टेटस टाकणे, डिजीटल बॅनर लावणे त्याचबरोबर वाढदिवसाच्या जंगी पार्ट्या करणे धांगडधिंगा करणे हे आता नित्याचे झाले आहे. परंतु सामाजिक उत्तरदायित्वाची जाणिव काही तरूण वाढदिवसाचे औचित्य साधुन सामाजिक उपक्रम राबवत असतात. असा एक उपक्रम अनुराग गुगळे या तरूणाने नुकताच राबवला आहे. (Anurag’s initiative)

जामखेड शहरातील प्रसिध्द कापड व्यवसायिक आनंद गुगळे (शांतीराज ) यांचे चिरंजीव अनुराग आनंद गुगळे यांच्या 18 व्या वाढदिवसा निमित्त सौताडा घाट परिसरात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. (Celebrating birthday by planting trees: Anurag’s initiative) त्याचबरोबर या भागात असलेल्या पहिल्या काही झाडांना आणि अनुराग गुगळे यांनी लावलेल्या झाडांना पाणी टाकण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, आनंद गुगळे,मनाली गुगळे, गौरी पाटील, भारतीय जैन संघटनेचे तालुका समन्वयक प्रफुल्ल सोळंकी, अरुण लटके, प्रा पोपट जरे सर, सार्थक कोठारी,तनुज कासवा,अमन भैसाडे, रोनित खूपसे, विकी टेकाळे, शहाजी डोंगरे वनमजूर ताहेरअली सय्यद आदी उपस्थित होते