पिंपरखेडमध्ये धाडसी चोरी, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल, ऐन सणासुदीत चोरटे पुन्हा झाले सक्रीय !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । शेतात लिंबू काढण्यास गेलेल्या शेतकऱ्याच्या घरी भरदिवसा धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तब्बल 70 हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. ही घटना जामखेड तालुक्यातील पिंपरखेड शिवारात घडली आहे. या प्रकरणी जामखेड पोलिसांत आण्णासाहेब पाडुरंग शिंदे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Daredevil theft in Pimperkhed, crime registered against unknown accused, thieves active during festive season

याबाबत सविस्तर असे की, आण्णासाहेब पाडुरंग शिंदे हे आपल्या कुटुंबासह आपल्या शेतात लिंबू काढणीसाठी गेले होते. 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते 4 च्या सुमारास शिंदे यांच्या पत्नी शेतातूून घरी गेल्या. तेव्हा त्यांना आपल्या घरात काही तरी गडबड झाली असल्याची बाब निदर्शनास आली. बंद असलेले घर त्यांना उघडे दिसताच त्यांनी आपले पती आण्णासाहेब शिंदे यांना आवाज देत घरी बोलावून घेतले. आपले बंद असलेले घर उघडे हे पाहून शिंदे हेही चक्रावून गेले होते.

यावेळी शिंदे पती पत्नीने दाराजवळ जाऊन पाहिले असता, त्या आपल्या घराचे कुलूप तुटलेले, कडी कोयंडे खाली पडलेले दिसले. दार उघडे असे दृश्य दिसले, यावेळी त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, घरातील सामानाची उचका पाचक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

घरातील कपाटाचीही उचकापाचक करून दागिणे आणि रोख रक्कम चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना कळवल , दरम्यान, या घटनेत तब्बल 55 हजार रूपये किमतीचे वेगवेगळे दागिणे चोरीस गेले आहेत. तर 13 हजार रूपयांची रोख रक्कम असा तब्बल 60 ते 70 हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला आण्णासाहेब पांडुरंग शिंदे (वय 53) रा पिंपरखेड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदर घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी घटनास्‍थळी भेट दिली. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. ऐन सणासुदीत चोरट्यांनी पुन्हा डोके काढल्याने जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.