सर्वपक्षीय नेत्यांनी केला आबासाहेब ढवळे यांचा नागरी सत्कार

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ।  सर्वपक्षीय घटकांना सोबत घेऊन काम करणारं युवा राजकीय नेतृत्व अशी ओळख असलेल्या आबासाहेब ढवळे यांची हळगावच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हळगाव ग्रामस्थांच्या वतीने ढवळे यांचा नुकताच नागरी सत्कार करण्यात आला.

आबासाहेब ढवळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड होताच त्यांचा विविध घटकांकडून नागरी सत्कार करण्यात येत आहे.आबासाहेब ढवळे यांच्या वर्ग मित्रांकडूनही नुकताच त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

वर्गमित्रांनी केलेल्या सत्काराने आबासाहेब ढवळे गहिवरून गेले होते. ढवळे यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचे वर्गमित्रांनी यावेळी कौतुक केले. हळगावच्या विकासात आबासाहेब ढवळे करत असलेल्या कार्यात सदैव सहयोग आणि योगदान देण्याचा शब्द वर्गमित्रांनी दिला.

दरम्यान हळगावमधील सत्ताधारी आणि विरोधी गटातील सर्वांनीच आबासाहेब ढवळे यांच्या निवडीनंतर नागरी सत्कार करत आबासाहेब ढवळे यांचा गौरव केला.

गावकऱ्यांकडून झालेल्या नागरी सत्काराला उत्तर देताना उपसरपंच आबासाहेब ढवळे म्हणाले की, गावाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्याकरता सदैव प्रयत्न केले जातील, गोरगरिबांची कसल्याही प्रकारची अडवणूक केली जाणार नाही, सर्वांना सोबत घेऊन कामे केली जातील, कुठल्याही प्रकारचे राजकारण केले जाणार नाही, वर्ग मित्रांनी आणि गावकऱ्यांनी तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या सत्कारामुळे जबाबदारी आणखीन वाढली आहे. सर्वांनी जे प्रेम आणि विश्वास दाखवला आहे त्याला कधीच तडा जाऊ दिला जाणार नाही असा शब्द त्यांनी यावेळी बोलताना दिला.

यावेळी जेष्ठ नेते किसनराव ढवळे, राजु भैय्या सय्यद, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, माजी सरपंच तात्याराम काळे, ग्रामपंचायत सदस्य रामदास शिंदे, विनफिनचे अध्यक्ष राजेंद्र ढवळे, दगडू पुराणे, माजी सरपंच राजेंद्र ढवळे, दादासाहेब पुराणे, अरविंद मंडलिक, बाळासाहेब ढवळे (अध्यक्ष), नामदेव ढवळे (साहेब), माजी चेअरमन गणपत ढवळे, रमण कांकरिया, अविनाश ढवळे, गणेश दळवी, धनंजय पुराणे, धनंजय काळाणे, महादेव ढवळे, किसन ढवळे, हरिदास शिंदे, बापुराव ढवळे, आबासाहेब वाघमोडे, माजी सरपंच सुभाष कापसे, महादेव रंधवे, माजी चेअरमन बाळासाहेब ढवळे, शांतीलाल लांडे, तंटामुक्ती अध्यक्ष नानासाहेब ढवळे, सुनिल ढवळे (अध्यक्ष), विशेष कार्यकारी अधिकारी लतिफभाई शेख, सुरेश कांकरिया, स्कूल कमिटी अध्यक्ष मालोजी ढवळे, संचालक अंकुश ढवळे सर, नारायण करगळ, केरबा वाघमोडे, दादा शिंदे, उद्योगपती अरूण कापसे सह आदी यावेळी उपस्थित होते.