अखेर राष्ट्रवादीची मोठी घोषणा, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी विद्याताई चव्हाण यांची निवड

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांच्या नियुक्ती करण्याची घोषणा राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा खासदार फौजिया खान यांनी केली. (big announcement NCP, the election of Vidyatai Chavan as the State President of the Women’s Front)

रूपालीताई चाकणकर ह्या यापुर्वी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष होत्या, त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासुन महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचच लक्ष लागले होते.

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी नाव निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादीत मोठी खलबते झाली. अखेर प्रदेशाध्यक्षपदासाठी विद्या चव्हाण यांचे नाव निश्चित करण्यात आले. माजी आमदार असलेल्या विद्या चव्हाण ह्या अतिशय अभ्यासू आणि आक्रमक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.

राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय महिला आघाडीच्या अध्यक्षा फौजिया खान यांनी विद्या चव्हाण यांना निवडीचे पत्र दिले. राष्ट्रवादीने निष्ठावंत कार्यकर्तीच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून पक्षात निष्ठावंताना न्याय दिला जातो हा संदेश दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसने महिला प्रदेशाध्यक्षपद निवड करण्याबरोबरच वेगवेगळ्या विभागांसाठी विभागीय अध्यक्षांच्याही निवडी जाहिर केल्या आहेत.

  1. नागपुर विभाग : शाहीन हकीम ( Shahin Hakeem)
  2. आमरावती विभाग : वर्षा निकम ( Varsha Nikam)
  3. औरंगाबाद विभाग : शाझिया शेख ( Shazia Shaikh)
  4. लातुर विभाग : वैशाली मोते ( Vaishali mote)
  5. पुणे विभाग : वैशाली नागवडे (Vaishali Nagwade)
  6. सिंधुदूर्ग विभाग : अर्चना घारे ( Archana Ghare)
  7. ठाणे विभाग : .ॠता अव्हाड ( Ruta Awhad)
  8. उत्तर महाराष्ट्र : अनिता परदेशी ( Anita Pardeshi)