ग्रामपंचायत निवडणुक : राम शिंदे vs रोहित पवार राजकीय संघर्षाची ठिणगी पेटली (Ram Shinde vs Rohit Pawar)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख): विधानसभा निवडणुकीत राज्यात गाजलेल्या राम शिंदे विरूध्द रोहित पवार (Ram Shinde vs Rohit Pawar) या लढतीचे लोण आता ग्रामपंचायत निवडणुकीपर्यंत येऊन पोहचले आहे.यंदा जामखेड तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांना मोठे राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. यापुर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये कधीच बड्या राजकीय नेत्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारात उड्या घेतल्या नव्हत्या मात्र यंदा आजी माजी आमदारांनी ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी कंबर कसल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता भलत्याच प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राम शिंदे विरूध्द रोहित पवार असा संघर्ष जामखेडमध्ये पेटला आहे. (In the Gram Panchayat elections, Ram Shinde vs Rohit Pawar sparked a political struggle)

रोहित पवार विरूध्द राम शिंदे या सामन्याने शुक्रवारी खर्ड्याच्या राजकीय मैदानात चांगलेच रंग भरले. माजी मंत्री राम शिंदे यांनी भाजपप्रणित पॅनलसाठी खर्डा शहरात रॅली काढली. रॅलीला जोरदार प्रतिसाद मिळाला. रॅलीनंतर घोंगडी बैठका घेत राम शिंदेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राम शिंदे यांच्या रॅलीला जोरदार प्रतिसाद मिळाल्याने भाजपच्या गोटात उत्साह संचारला आहे.

खर्डा शहरावर सध्या भाजपाची सत्ता आहे. ती हिसकावण्यासाठी रोहित पवारांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. तर माजी मंत्री राम शिंदे यांनी सत्ता कायम राखण्यासाठी डावपेच राबवण्याची मोहिम गतीमान केली आहे. (Ram Shinde vs Rohit Pawar)

तर दुसरीकडे शुक्रवारीच आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी प्रणित स्थानिक महाविकास आघाडीच्या पॅनलसाठी खर्डा बसस्थानक परिसरात जाहिर सभा घेत विकासाचे व्हिजन जनतेसमोर मांडले. स्थानिक महाविकास आघाडीला साथ देण्याचे अवाहन केले. जर कुणी दमबाजी करत असेल तर मला कळवा त्याचा बंदोबस्त करतो असा थेट इशारा विरोधकांना देत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.

दरम्यान शुक्रवारी खर्ड्यात रंगलेल्या राजकीय जुगलबंदीत पवार व शिंदे नेमके काय म्हणालेत ऐकुयात खालील व्हिडीओमध्ये ! (Ram Shinde vs Rohit Pawar)