नितीन देसाई आत्महत्या प्रकरण : ऑडिओ क्लिपमध्ये रशेष शाह, स्मित शहा, केयुर मेहता, आर. के. बन्सल यांच्या विषयी धक्कादायक खुलासा

मुंबई : प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai Death) यांनी आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही ऑडिओ क्लिप (Nitin Desai Audio clip) बनवल्या होत्या. आता त्या ऑडिओ क्लिप्सचा तपशील समोर आला आहे. यात एडेलवाईस कंपनीचे (Edelweiss Company) अध्यक्ष रशेष शाह (Rashesh Shah) आणि अन्य तीन जणांवर नितीन देसाई यांनी गंभीर आरोप केले आहेत. नितीन देसाई मृत्यू प्रकरणात नितीन देसाईंच्या पत्नी नेहा देसाई (Neha Desai) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

रशेष शाहनं (Rashesh Shah) माझा स्टुडिओ गिळण्याचं काम केलं स्मित शहा, केयुर मेहता, आर. के. बन्सल (Smit Shah, Keur Mehta, R. K. Bansal) यांनी माझा स्टुडिओ लुटला, असंही देसाईंनी ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे. या सगळ्याचा खालापूर पोलीस (Khalapur Police Station) सखोल तपास करत आहेत.

नितीन देसाई यांनी ऑडिओ क्लिपमध्ये केला धक्कादायक खुलासा

Nitin Desai Suicide Case,  Rashesh Shah, Smit Shah, Keyur Mehta, R. K. Bansal About them Shocking disclosure in audio clip

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या व्हॉईस रेकॉर्डरवरच्या ऑडिओ क्लिप्स या पोलीस तपासाच्या केंद्रबिंदू ठरल्या आहेत. ऑडिओ क्लिप्समध्ये नितीन देसाई यांनी गंभीर आरोप केले आहेत. नितीन देसाई ऑडिओ क्लिपमध्ये म्हणाले, रशेष शहा हा गोडबोल्या असून त्याने छोटया मोठया उद्योजकांसाठी कष्टाने बनविलेला माझा स्टुडिओ गिळण्याचे काम केले. त्याला 100 फोन केले परंतु फोन उचलत नाही. EOW, NCLT DRT यांच्याकडून प्रचंड छळवाद केला. माझ्याकडे दोन- तीन इनव्हेस्टर गुंतवणुक करण्यासाठी तयार असताना मला सहाकार्य केले नाही. माझ्यावर दुप्पच तिप्पट किंमतीचा बोजा टाकून प्रेशराईज केले. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माझ्यावर वेगळ्या पद्धतीने प्रेशर करून मी दिलेल्या गोष्टी मान्य करत नाहीत.

नराधमांनी माझ्यावर दबाव टाकला. सोन्यासारखे असलेले ऑफिस विकायला लावले.

स्मित शहा, केयुर मेहता, आर.के.बन्सल यांनी माझा स्टुडीओ लुटण्याचा, माझी नाचक्की करून मला घेरण्याचे काम करीत आहेत. या लोकांनी माझी वाट लावली आहे. मला पैशांच्या धमक्या देऊन नराधमांनी माझ्यावर दबाव टाकला. सोन्यासारखे असलेले ऑफिस विकायला लावले. एका मराठी कलाकाराला जिवे मारण्याचे काम या नराधमांकडून होत आहे. माझ्या विरोधात षडयंत्र रचले आणि मला संपविले. माझ्या मनात नसतानाही त्यांनी मला टोकाचे पाऊस उचलण्यास भाग पाडले, असे नितीन देसाई म्हणाले.

नितीन देसाईंच्या पत्नी नेहा देसाई यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल

नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. नितीन देसाईंच्या पत्नी नेहा देसाई (Neha Desai) यांच्याकडून ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईस ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात त्या पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्या पाच जणांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. एडलवाईज कंपनीचे चेअरमन रशेष शहा यांच्यासहित पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड पोलीस लवकरच चौघांना चौकशीला बोलवणार आहेत.