Manoj Jarange Patil : अजय महाराज बारस्करांच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटलांचा जोरदार पलटवार

Ajay maharaj baraskar : मराठा आरक्षणाच्या अंदोलनात मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी असलेल्या अजय महाराज बारस्कर यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बारस्कर महाराजांनी केलेल्या आरोपांवर मनोज जरांगे पाटील (manoj Jarange Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Ajay maharaj baraskar manoj Jarange Patil)

Manoj Jarange Patal strongly countered Ajay Maharaj Barskar's allegations

मनोज जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केल्याचा आरोप अजय महाराज बारस्कर यांनी केला होता. यावर जरांगे पाटील म्हणाले की, “तुकाराम महाराजांबाबत माफी मागतो. त्यांच्यासाठी प्रायश्चित्तसुद्धा करेन. संत तुकाराम महाराजांबाबत माझ्या तोंडून काही शब्द गेले असतील. उपोषणाच्या वेळी चिडचिड असते त्यावेळी झालं असेल. त्यामुळे मी यासाठी माफी मागतो. मी संत महात्मे आणि देवीदेवतांना मानणारा आहे. मी वारकरी संप्रदायाला मानतो. मी विद्रोही नाही. त्यामुळे महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल मी सपशेल माफी मागतो.”

“अजय महाराज बारस्कर यांचे आरोप हा सरकारचा ट्रॅप आहे. आतापर्यंत सहा महिने मी गोड होतो. हा सगळा मला बदनाम करण्याचा प्रयत्न असून यात मुख्यमंत्री शिंदेंचा देखील प्रवक्ता आहे. ज्याला फेसबूक लाईव्हचे लोकं विचारत नाही, त्याला माध्यमं कसं काय विचारायला लागलेत? अजय बारस्कर हा भोंदू आहे, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले की, “समाजासोबत तुम्ही प्रामाणिक रहा. गद्दारीचा शिक्का मारून घेऊ नका. तो कशाचा महाराज आहे. ते बांधावरुन उठले आणि महाराज झाले. जो घरापर्यंत येतो तो खरंच महाराज असू शकतो का. ते भोंदू आहेत,” असेही ते म्हणाले आहेत.