National Voter’s Day 2024 : लोकशाही बळकटीकरणासाठी तरूणांची भूमिका महत्वाची, तरूणांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नेहमी पुढे यायला हवे – डॉ. गोरक्ष ससाणे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : National Voter’s Day 2024 : भारत हा युवकांचा देश आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये युवकांची भूमिका महत्वपूर्ण असते. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व मतदान जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन (National Voter’s Day 2024) म्हणून साजरा केला जातो. तरूणांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रिया जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे अवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डाॅ गोरक्ष ससाणे यांनी केले. (Punyashlok Ahilya Devi Holkar Agricultural College)

role of youth is important for strengthening democracy, youth should always come forward to exercise their right to vote - Dr. Goraksha Sasane,National Voter's Day 2024

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयात गुरुवार, २५ जानेवारी, २०२४ रोजी राष्ट्रीय मतदार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे हे होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व पटवून दिले. (National Voter’s Day 2024)

ससाणे पुढे बोलताना म्हणाले की, आपल्या देशाची लोकशाही सुदृढ करण्यासाठी, चांगले लोक प्रतिनिधी निवडण्यासाठी व देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत तरूणांनी मतदानाद्वारे जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे अवाहन केले. (National Voter’s Day 2024)

विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्व समजावून सांगितले. विद्यार्थी प्रतिनिधी कु. समिक्षा वाघ हिने आपल्या सहकारी विद्यार्थांना मतदार नोंदणी करून हक्क बजावण्यासाठी जागरूक केले व महिलांनी मतदानात सक्रीय सहभाग नोंदवण्यासाठी आवाहन केले. (National Voter’s Day 2024)

यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय सोनावणे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे, नोडल अधिकारी, निवडणूक साक्षरता मंडळ डॉ. मनोज गुड आणि प्राध्यापक वृंद व्यासपीठावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण अधिकारी आणि निवडणूक साक्षरता मंडळ यांच्या मार्फत करण्यात आले होते. (National Voter’s Day 2024)

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनोज गुड यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. प्रणाली ठाकरे व आभारप्रदर्शन डॉ. निकीता धाडगे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (National Voter’s Day 2024)

शितल कलेक्शन जामखेड