अहमदनगर – बांगलादेश सायकल रॅलीत सहभागी झालेल्या फारूक बेग यांचा कर्जतकरांनी केला सन्मान

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : अहमदनगर ते बांगलादेश सामाजिक सलोखा सदभावना रॅलीत सहभागी होऊन कर्जतचे नाव देशपातळीवर झळकावल्याबद्दल कर्जतचे सामाजिक कार्यकर्ते फारूक बेग यांचा प्रवीण घुले मंडळाच्या यांनी शनिवारी कर्जत येथे नागरी सत्कार करण्यात आला. (Karjatkar honors Farooq Beg who participated in Ahmednagar Bangladesh Cycle Rally)

कर्जतचे सामाजिक कार्यकर्ते फारूक बेग हे अहमदनगर- बांगलादेश सामाजिक सलोखा रॅलीत सहभागी झाले होते. २ ऑक्टोबर ते २ डिसेंबर या ६० दिवसाच्या कालावधीत पार पडलेल्या ४ हजार ३०० किमी सायकल रॅलीत सहभाग नोंदविला होता.(Karjatkar honors Farooq Beg who participated in Ahmednagar Bangladesh Cycle Rally)

मागील आठवड्यात दि ७ जानेवारी रोजी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी बेग यांचा सन्मान राज्यपाल भवनात केला होता. शनिवार, दि १५ रोजी प्रवीण घुले मित्रमंडळाच्या वतीने फारूक बेग यांचा सन्मान जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रवीण घुले यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी नगरसेवक सचिन घुले, राष्ट्रवादीचे प्रा विशाल मेहत्रे, राजमाता जिजाऊ ग्रामविकास प्रतिष्ठानचे महेश तनपुरे, जेष्ठ नागरिक संघाचे शब्बीरभाई पठाण, इल्लूभाई पठाण, शरीफ पठाण, ओंकार तोटे, कासम पठाण, दत्ता नलवडे, सचिन धांडे, अजीज पठाण, जाहिद पठाण आदी उपस्थित होते.

यावेळी फारूक बेग यांनी ६० दिवसाच्या सदभावना रॅलीतील अनुभव, प्रवासातील सर्वसामान्य नागरिकांनी केलेली मदत-सहकार्य कथन करताना भावुक झाले होते.(Karjatkar honors Farooq Beg who participated in Ahmednagar Bangladesh Cycle Rally)