T20 world cup India vs Pakistan Macth : रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला, भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच कधी सुरू होणार? मोबाईलवर कसं पाहणार? जाणून महामुकाबल्याची माहिती

मेलबर्न, 22 ऑक्टोबर: आयसीसी टी 20 विश्‍वचषकाचा (T20 world cup 2022) पहिला सामना ऑस्ट्रेलियात पार पडला यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. आता संपुर्ण क्रिकेट विश्वाला भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याचे वेध लागले आहेत. यंदाच्या टी 20 विश्‍वचषकात दोन्ही संघात अतिशय काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. हा महामुकाबला पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट शौकिनची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

T20 world cup,India vs Pakistan match on Sunday, when will India vs Pakistan match start?,How to watch on mobile?, Know the information of the grand match,

गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान हे क्रिकेटविश्वातले पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येत आहेत. टी20 वर्ल्ड कपच्या सुपर 12 फेरीला सुरुवात झाली आहे. या फेरीत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा पहिला सामना मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे.मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड हे जगातलं सर्वात मोठं दुसरं क्रिकेट ग्राऊंड.

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रविवारी तब्बल 90 हजार प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत. तर जगभरात करोडो चाहते हे सामना टीव्ही किंवा मोबाईलवर लाईव्ह पाहणार आहेत.

T20 world cup,India vs Pakistan match on Sunday, when will India vs Pakistan match start?,How to watch on mobile?, Know the information of the grand match,

भारतीय वेळेनुसार कधी सुरु होणार भारत पाकिस्तान मॅच? 

ऑस्ट्रेलियन प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामना सुरु होईल. पण भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या प्रमाणवेळेत 5.30 तासांचा फरक आहे. त्यामुळे भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वा. भारत-पाकिस्तान मॅच सुरु होईल.

कोणत्या चॅनेलवर दिसणार मॅच?

टी20 वर्ल्ड कपच्या सगळ्या सामन्यांचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस नेटवर्कवरुन केलं जात आहे.तर लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने हॉटस्टारवरुन केलं जातंय.

मेलबर्नमध्ये वेळेवर सुरु होणार सामना?

गेल्या काही दिवसांपासून मेलबर्नमध्ये पाऊस पडतोय आणि त्याच कारणामुळे या सामन्यावरही अनिश्चिततेचे ढग दाटून आले होते. पण आज दिवसभर मेलबर्नमध्ये पाऊस पडलेला नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. रविवारीही मेलबर्नमध्ये असंच वातावरण राहिलं तर पूर्ण ओव्हर्सचा खेळ होण्याचा अंदाज आहे.

कशी असणार प्लेईंग इलेव्हन?

हवामानाच्या अनिश्चिततेमुळे दोन्ही संघांनी आपल्या प्लेईंग इलेव्हनबाबत कोणतीही अपडेट दिलेली नाही. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत आपल्या प्लेईंग इलेव्हनचा खुलासा केलेला नाही. मॅचआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितनं म्हटलं की, ‘मेलबर्नमध्ये हवामान दर मिनिटाला बदलत आहे. उद्या सकाळी असलेल्या परिस्थितीनुसार आम्ही आमची प्लेईंग इलेव्हन ठरवू. कारण आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत थांबावं लागेल.

भारतीय संघ खालील प्रमाणे

रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन , हर्षल पटेल, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अर्शदीप सिंग 

पाकिस्तानी संघ खालील प्रमाणे

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हॅरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हस्नैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, शान मसूद, फखर जमान