डाॅ भास्कर मोरे आणि डाॅ वर्षा मोरे यांनी जपली सामाजिक बांधिलकी, रत्नदीपच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस, आगाऊ पगार, ब्लेझर कोट भेट !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 22 ऑक्टोबर 2022 । जामखेड तालुक्यातील रत्नदीप शैक्षणिक संकुलातील बीएचएमएस फार्मसी व नर्सिंग महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर या संस्थेच्या वतीने दिपावली निमित्त दिवाळी बोनस देण्यात आला. कोरोना महामारीनंतर साजऱ्या होणाऱ्या यंदाचा दिवाळीत हाती बोनस मिळताच कर्मचारी आनंदून गेले होते.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याची परंपरा यंदाही कायम राखली.
बोनस, आगाऊ पगार, ब्लेझर कोटचे वितरण
जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलातील बीएचएमएस,फार्मसी व नर्सिंग महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रूपये दिवाळी बोनस म्हणून वितरीत करण्यात आले. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचा पगार आगाऊ वितरीत करण्यात आला. तसेच संस्थेच्यामार्फत सर्व कर्मचाऱ्यांना ब्लेझर-कोट भेट देण्यात आले, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील यांनी दिली.
या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला आनंद सोहळा
यावेळी रत्नदीप फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जितेंद्र कुमार,नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य प्रज्ञा पुजारी, रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्रप्राचार्य डॉ.संदीप सांगळे यांच्यासह,डॉ. सरफराज खान, डॉ.गफ्फार शेख, डॉ.झेबिया शेख, डॉ.संजय पोपळे,डॉ.सुग्रीव घोडके, डॉ.श्रध्दा मुळे, डॉ.दिपाली सांगळे,डॉ.मनिषा बांगर,रवींद्र ढवळे, प्रशांत राळेभात,रोहित राळेभात,धनराज ढफळ,अशोक पवार, जीवन पवार,अनिता काळे, पुजा खडताळे, क.सय्यद,सचिन पवार आदी उपस्थित होते.
रत्नदीप शैक्षणिक संकुलात राज्यातील बाराशे विद्यार्थी शिक्षण घेतात
डॉ.भास्करराव मोरे पाटील यांनी रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर या संस्थेच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोरोना आपत्तीच्या काळात देखील त्यांनी जामखेड तालुक्यातील लोकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले होते. डाॅ मोरे यांच्या संस्थेत होमिओपॅथिक, नर्सिंग,फार्मसी अभ्यासक्रमाचे महाविद्यालय आहे. याठिकाणी राज्यातील बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
प्राचार्या प्रज्ञा पुजारी यांनी मानले संस्थेचे आभार
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर या संस्थेचे रत्नदीप शैक्षणिक संकुल ही रत्नदीप फॅमिली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील हे रत्नदीप फॅमिलीचे पालक आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे संस्थेत सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कौटुंबिक वातावरण मिळत आहे. याचा आम्हां सर्वांना सार्थ अभिमान व आनंद आहे. संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस व आगाऊ पगार दिल्याबद्दल मी सर्वांच्यावतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांना धन्यवाद देते व आभार व्यक्त करते, अशी भावना रत्नदीप नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या प्रज्ञा पुजारी यांनी यावेळी व्यक्त केली.