आक्रमक शिवसैनिकांंनी आमदार तानाजी सावंतांंचे कार्यालय फोडले

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिवसेनेत उफाळून आलेल्या बंडखोरीवर मागील पाच दिवसांपासून मोठे राजकीय नाट्य रंगले आहे. पाच दिवसांपासून शांत असलेल्या शिवसैनिकांच्या संयमाचा बांध फुटू लागला आहे. याचीच प्रचिती आज पुण्यात आली. (Aggressive Shiv Sainiks Vandalized MLA Tanaji Sawant’s office)

चोंडीसाठी 7 कोटी तर मतदारसंघातील इतर देवस्थानांसाठी 1 कोटी 65 लाखांचा निधी मंजूर !

मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंडात महत्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची आक्रमक शिवसैनिकांनी तोडफोड केल्याची घटना शनिवारी घडली आहे.

साहेब लाल दिवा घेऊन लवकर मतदारसंघात या… कर्जत – जामखेडकरांना लागले राम शिंदेंच्या मंत्रीपदाचे वेध !

शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांना शिवसैनिकांच्या रोषाला अधिक सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिवसैनिक सावंत यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत.

तोपर्यंत मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा,राज्यपालांकडे बीडच्या शेतकऱ्याची मागणी !

आमदार सावंत यांच्या पुण्यातील कात्रज येथील कार्यालयाबाहेर काल शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली होती. तर आज शिवसैनिकांनी त्याच्या कार्यालयावर जोरदार हल्ला चढवत कार्यालयाची तोडफोड केली. सावंत यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.