जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने केलेल्या बंडखोरीचा आजचा पाचवा दिवस आहे. या गटाने खरी शिवसेना (shivsena) आमचीच म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. शिवसेनेतील बंडखोरीमुळे ठाकरे सरकार (Thackeray government) अल्पमतात आले आहे.
गेल्या पाच दिवसांपासून महाराष्ट्राबाहेर असलेल्या शिंदे गटाने आता निर्णायक लढाई सुरू केली आहे.कोणत्याही स्थितीत पक्षात पुन्हा परतायचे नाही, असाच निर्णय शिंदे गटाकडून घेतला जावू लागला आहे. यामुळे आता शिंदे गट भाजपशी हातमिळवणी करणार हे जवळपास स्पष्ट आहे. गुवाहटी येथे असलेल्या शिंदे गटातील आमदारांची संख्या आता 50 च्या आसपास झाली आहे.
दरम्यान शिंदे गटाकडून आज सायंकाळी आपल्या गटाचे नाव जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार या गटाचे नाव ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज सायंकाळी शिवसेना बंडखोर आमदार दीपक केसरकर हे यासंदर्भातील घोषणा करू शकतात असे वृत्त आहे. (Rebel Eknath Shinde became the name of the group, Eknath Shinde Guwahati news today)
आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड
शिवसेनेत उफाळून आलेल्या बंडखोरीवर मागील पाच दिवसांपासून मोठे राजकीय नाट्य रंगले आहे. पाच दिवसांपासून शांत असलेल्या शिवसैनिकांच्या संयमाचा बांध फुटू लागला आहे. याचीच प्रचिती आज पुण्यात आली.
मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंडात महत्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची आक्रमक शिवसैनिकांनी तोडफोड केल्याची घटना शनिवारी घडली आहे.