रोहित पवारांच्या शिलेदाराने धरली भाजपची वाट, युवा नेते संभाजी कोल्हे यांनी भाजपात का केला प्रवेश ? वाचा सविस्तर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेेख । कर्जत – जामखेड मतदारसंघातील ज्या तरूण कार्यकर्त्यांच्या ताकदीवर रोहित पवार हे 2019 च्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने आमदार झाले, तेच तरूण कार्यकर्ते पवारांच्या कार्यपद्धतीवर निराश झाले आहेत. रोहित पवारांच्या ‘वापरा आणि फेकून द्या’ या स्टाईलला वैतागलेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकण्यास सुरुवात केली आहे.

Shiledara of Rohit Pawar waited for BJP, why did youth leader Sambhaji Kolhe join BJP?, jamkhed latest news,

आमदार रोहित पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या संभाजी कोल्हे यांनी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीत सुरु असलेल्या खदखदीला संभाजी कोल्हे यांनी यानिमित्ताने वाटच मोकळी करून दिली, अशी चर्चा आता मतदारसंघात सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते भाजपात प्रवेश करू लागल्याने राष्ट्रवादीसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे.

Shiledara of Rohit Pawar waited for BJP, why did youth leader Sambhaji Kolhe join BJP?, jamkhed latest news,

महाविकास सरकार सत्तेवर आल्यानंतर कर्जत – जामखेड मतदारसंघात भाजपला भगदाड पाडण्यासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार मोहीम राबवली गेली होती. याला मोठे यश आले होते. परंतू, आता राष्ट्रवादीचे ग्रह फिरू लागल्याचे दिसत आहे. मतदारसंघात राष्ट्रवादीविषयी नाराजी पसरली आहे. नाराज कार्यकर्ते आणि महत्वाचे नेते पक्षाला राम राम ठोकू लागले आहेत. याची पहिली ठिणगी जामखेड तालुक्यातील राजुरी ग्रामपंचायतमध्ये पडली आहे. राजुरीतील राष्ट्रवादीच्या 200 कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

Shiledara of Rohit Pawar waited for BJP, why did youth leader Sambhaji Kolhe join BJP?, jamkhed latest news,

आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपात प्रवेश केलेल्या 200 जणांमध्ये युवा नेते संभाजी कोल्हे यांचाही समावेश आहे. संभाजी कोल्हे हे 2017 ते 2020 पर्यंत संभाजी ब्रिगेडचे जामखेड तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेेच आमदार रोहित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून संभाजी कोल्हे यांना राज्यात ओळखले जात होते. कोल्हे यांनी भाजपात प्रवेश केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

संभाजी कोल्हे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्यासाठी निवडणूक काळात सोशल मिडीया कॅम्पेनिंगसाठी जी टीम काम करत होती.त्या टीममध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडली होती. सोशल मिडीयावर पवार यांच्यासाठी कोल्हे यांनी जोरदार बॅटींग केली होती. त्याचा मोठा फायदा पवारांना निवडणुकीत झाला होता.

Shiledara of Rohit Pawar waited for BJP, why did youth leader Sambhaji Kolhe join BJP?, jamkhed latest news,

युवा नेते संभाजी कोल्हे हे बहुजन चळवळीत महत्वाचे कार्यकर्ते आहेत. त्यांचा राज्यभरात मोठा राजकीय मित्रपरिवार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोल्हे आणि त्यांच्या राज्यातील मित्रपरिवाराने सोशल मिडीयावर महाविकास आघाडीची बाजू जोरदार लढवली होती. मात्र असे असताना देखील कोल्हे यांना आमदार रोहित पवार यांच्या यंत्रणेकडून सन्मानाची वागणूक दिली जात नसायची.

तसेच आमदार रोहित पवार आणि त्यांच्या कार्यालयाशी वेगवेगळ्या जनहिताच्या कामानिमित्त संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होत नसायचा, कोल्हे यांनी सुचवलेली कामे होत नसायची, त्यामुळे कोल्हे आणि त्यांचे समर्थक गेल्या काही महिन्यांपासून पक्षात नाराज होते. याच नाराजीचा उद्रेक संभाजी कोल्हे यांच्या भाजपा प्रवेशाने झाला.

Shiledara of Rohit Pawar waited for BJP, why did youth leader Sambhaji Kolhe join BJP?, jamkhed latest news,

बहुजन चळवळीतील काम करणारा, राज्यभरात संपर्क असलेला, सोशल मिडीयावर रोहित पवारांची बाजू मांडणारा संभाजी कोल्हे हा युवा कार्यकर्ता आमदार रोहित पवारांसह त्यांच्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीला वैतागून पक्षातून बाहेर पडला. कोल्हे यांच्यासारख्या लढवय्या कार्यकर्त्याने रोहित पवारांची सोडलेली साथ पवारांसाठी मोठा धक्का देणारी ठरली आहे, तर आमदार राम शिंदे यांना संभाजी कोल्हे यांच्या रूपाने महत्वाचा युवा कार्यकर्ता मिळाल्याने शिंदे यांची ताकद वाढली आहे.

Shiledara of Rohit Pawar waited for BJP, why did youth leader Sambhaji Kolhe join BJP?, jamkhed latest news,

संभाजी कोल्हेंसारखे अनेक लढवय्ये युवा कार्यकर्ते पक्षात नाराज

कर्जत – जामखेड मतदारसंघामधील राष्ट्रवादीचे अनेक युवा कार्यकर्ते पक्षात अस्वस्थ आहेत. तशी चर्चा सातत्याने होत आहे. अनेक कार्यकर्ते खाजगीत आमदार रोहित पवार आणि त्यांच्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर खाजगीत आगपाखड करताना दिसत आहेत. ज्यांनी निवडणूक काळात नेतृत्वाच्या विजयासाठी जीवाचं रान केलं त्यांनाच नेतृत्वाकडून सातत्याने डावलण्यात येत आहे. चमकोगिरी आणि हुजरेगिरी करणाऱ्यांना मात्र नेतृत्वाकडून महत्त्व दिले जात आहे. यामुळे मतदारसंघामधील युवा कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ आहेत. जामखेडमधील रोहित पवारांचे कट्टर समर्थक असलेल्या संभाजी ब्रिगेडचे माजी तालुकाध्यक्ष संभाजी कोल्हे यांनी जशी भाजपची वाट धरली, तशीच वाट अनेक कार्यकर्ते अगामी काळात धरतील, अशी सध्याची स्थिती आहे. युवा कार्यकर्त्यांमधील अस्वस्थेचा आगडोंब उसळल्यास याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसेल, असा कयास राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

2019 निवडणुकीत पदरमोड करून पक्षासाठी काम केलं, पण आम्ही केलेल्या कामाची कदर राष्ट्रवादीत झाली नाही, आम्ही आमच्यासाठी काहीच मागितलं नाही, जनहिताच्या कामांसाठी रोहित दादांशी वेगवेगळ्या माध्यमांतून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही, यामुळे आमच्या पदरी निराशाच आली.आपला तो आपलाच असतो म्हणूनच मी व माझ्या सहकाऱ्यांनी आमदार प्रा राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपात जाण्याचा निर्णय घेतला, अशी भावना युवा नेते संभाजी कोल्हे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर व्यक्त केली.