आमदार राम शिंदेंविरोधात उसळली संतापाची लाट, कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादीकडून नोंदविण्यात आला निषेध !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो साखर कारखान्याविरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करणाऱ्या भाजपा नेते आमदार राम शिंदे यांच्याविरोधात कर्जत-जामखेड मतदारसंघात संतापाची लाट उसळली आहे. जामखेड तालुक्यात राष्ट्रवादीकडून राम शिंदे यांचा निषेध करण्यात येत आहे.

wave of anger against MLA Ram Shinde, protest was registered by NCP in Karjat Jamkhed, kharda news

राज्य शासनाने यंदा गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.15 ऑक्टोबर पुर्वीच आमदार रोहित पवार यांच्या इंदापूरातील बारामती ॲग्रो साखर कारखान्याने 10 ऑक्टोबरलाच गळीत हंगाम सुरु केला. या कारखान्याने नियमभंग केला आहे. त्यामुळे कारखान्याच्या संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजपा आमदार राम शिंदे यांनी राज्याच्या साखर आयुक्तांकडे 10 रोजी केली होती. या मागणीनंतर राजकीय वातावरण तापले आहे.

wave of anger against MLA Ram Shinde, protest was registered by NCP in Karjat Jamkhed, kharda news

आमदार राम शिंदे यांनी बारामती ॲग्रोविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्यानंतर याचे तीव्र पडसाद सोशल मिडीयावर उमटत आहे. आज 11 रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा शहरात राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकरी, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटेच्या कार्यकर्त्यांकडून आमदार राम शिंदे यांचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी आमदार राम शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

wave of anger against MLA Ram Shinde, protest was registered by NCP in Karjat Jamkhed, kharda news

आपण काहीच करायचं नाही पण करणाऱ्याच्या मागं लागायचं ही जी वृत्ती आहे त्याचा मी निषेध करतो असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी देव सुध्दा सोडले नाहीत, खर्ड्यात धार्मिक स्थळांसाठी मंजुर झालेल्या कोट्यावधी रूपये खर्चाच्या कामांना शिंदे यांनी स्थगिती आणली. तुमच्या राजकारणापायी तुम्ही देव सुध्दा सोडत नाहीत. विकासाचे राजकारण करण्याची गरज असताना स्थगितीचे, सुडाचे राजकारण करण्याचे उद्योग सुरु आहे अशी टीका राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांनी केली.

wave of anger against MLA Ram Shinde, protest was registered by NCP in Karjat Jamkhed, kharda news

खरं तर, राम शिंदे साहेबांच्या कामाची पध्दत बघून वाईट वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिंदे साहेब मंत्री असताना चांगली कामं केली नाहीत, म्हणून त्यांना लोकांनी पाणी पाजलं, आता आमदार झाल्यावर तरी त्यांनी नीट कामे करावीत. त्यांनी लोकांची प्रश्न उचलून धरावेत असे अपेक्षित असताना ते शेतकरी विरोधी मागण्या करत आहेत. वास्तविक शिंदे साहेबांचा इतिहास पाहिला असता ते कधीच अडचणीच्या काळात धावून आले नाहीत, अशी टीका राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांनी केली.

आमदार राम शिंदे यांनी आकसाचे आणि सुडबुध्दीचे राजकारण करण्याऐवजी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमांतून कर्जत-जामखेड मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लावावेत. रोहित पवारांच्या कामांना स्थगिती आणणे, झालेल्या कामांची चौकशी लावणे त्याचबरोबर कारखान्याविरोधात कारवाई करण्याची व्यर्थ मागणी आमदार राम शिंदे यांनी करू नये, असे यावेळी विजयसिंह गोलेकर म्हणाले.

wave of anger against MLA Ram Shinde, protest was registered by NCP in Karjat Jamkhed, kharda news

जामखेड तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागील वर्षी तालुक्यात ऊस तोडीसाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी होती. यंंदाही ऊसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. कारखाने जास्त काळ चालवणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा ऊस गाळप होणे आवश्यक आहे. मात्र आमदार राम शिंदे यांनी घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रपंचावरच घाला घालण्याचे काम होत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल लोंढे यांनी केली.

यावेळी सरपंच आसाराम गोपाळघरे, स्वाभिमानीचे सुनिल लोंढे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, मुकुंद गोलेकर, संजय सुर्वे, महालिंग कोरे, शिवाजी भोसले, प्रशांत वारे, तात्या ढेरे, कांतीलाल वाळुंजकर, राजु जिकरे, प्रकाश गोलेकर, नरेंद्र जाधव, अमर चाऊस, ज्ञानेश्वर थोरात, बबन मदने, रमेश गोलेकर, मोहन भोसले, संतोष गंभीरे, सुरेश साळुंके, हरीदास गोलेकर, नितीन गोलेकर, भिमराव लेंडे सह आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीकडून आज खर्डा शहरात करण्यात आलेल्या अंदालनात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वेगवेगळी फलके हातात शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी करताना दिसत होते. या फलकांवर नेमकं काय लिहलं होतं. ? पाहूयात

 • कोरोनाच्या काळात घाबरून बसले घरात
 • आता का सगळीकडे सुरुय नुसती वरात
 • राम शिंदे जवाब दो
 • ऊस राहिला शिल्लक थळात
 • तर शेतकरी जातो गाळात
 • तेव्हा राम शिंदे लपतात बिळात
 • पण सुरु झाला कारखाना
 • तर नागोबाने लगेच फणा काढला
 • राम शिंदे जवाब दो
 • विकास करायची होती संधी
 • तेव्हा मंत्रिपदाची चढली धुंदी
 • पण आता लोकांनी बसवलं घरी
 • पण तरीही व्यर्थ बडबड करी
 • राम शिंदे कधी सुधारणार