मृतदेह पाहताच खासदार प्रीतम मुंडेंना आली भोवळ, गोपीनाथ मुंडेंच्या विश्वासू कार्यकर्त्याच्या आत्महत्येने बीड जिल्हा हादरला, हत्या की आत्महत्या तपास सुरु

बीड : भाजपच्या गोटात खळबळ उडवून देणारी घटना मंगळवारी बीड शहरात घडली आहे. बीड भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी ( Bhagirath Biyani )  आपल्या राहत्या घरी स्वता:वर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) ह्या तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या मात्र तेथील धक्कादायक चित्र पाहून त्यांना भोवळ आली.

After seeing dead body MP Pritam Munde came Bhoval, Gopinath Munde's trusted activist's suicide shocked Beed district,  Bhagirath Biyani suicide or murder investigation started

Tv9 मराठीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासह खा. प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे यांच्या अत्यंत निकटचे समजले जाणारे भगीरथ बियाणी यांच्या अशा एकाएकी निधनाने प्रीतम मुंडे यांना मोठा धक्का बसला. रुग्णालयात बियाणी यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी त्या पोहोचल्या. मात्र तेथील मृतदेह पाहूनच खा. प्रीतम मुंडे यांना भोवळ आली.

मुंडे यांचीही तत्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. अत्यंत जवळचा आणि निष्ठावंत कार्यकर्ता असल्याने खा. प्रीतम मुंडे ह्या प्रचंड अस्वस्थ झाल्या होत्या. रुग्णालयातील धक्कादायक चित्र पाहून खा. प्रीतम मुंडे यांनाही अश्रू अनावर झाले.

After seeing dead body MP Pritam Munde came Bhoval, Gopinath Munde's trusted activist's suicide shocked Beed district,  Bhagirath Biyani suicide or murder investigation started

गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून भगीरथ बियाणी यांची बीडच्या राजकारणात ओळख होती. मुंडे यांची कोणतीही सभा, कार्यक्रम असले की भगीरथ बियाणी यांच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्णच होत नसे. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या सर्व राजकीय कामाची जबाबदारी भगीरथ बियाणी यांच्याकडे होती. त्यांच्या विश्वासू समर्थकांपैकी ते एक होते.

भगीरथ बियाणी यांच्या राहत्या घरीच ही घटना घडली. सकाळी 11 वाजेच्या सुमारास बंदुकीतून गोळी झाडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात भगीरथ बियाणींचा मृतदेह आढळला. पोलिसांनी तत्काळ त्यांना शहरातील फिनिक्स रुग्णालयात दाखल केलं. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

सध्या बियाणी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बियाणी यांची आत्महत्या आहे की हत्या याचा तपास आम्ही करत आहोत, अशी माहिती बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.

दरम्यान, ही घटना घडताच बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरली. शेकडोंच्या संख्येने भाजप कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर जमा झाले आहेत. बियाणी यांच्या मृत्यूमुळे बीडवर शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.