Covid19 । राष्ट्रवादीचे दोन जेष्ठ मंत्री कोरोना पाॅझिटिव्ह

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Covid19 । राज्यात सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीत गेल्या सहा दिवसांपासून तळ ठोकून आहेत. त्यातच महाराष्ट्रात शिवसेना आणि शिवसैनिक बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक झाली आहे. शिवसेना विरूद्ध शिंदेसेना ही लढाई सुप्रीम कोर्टात पोहचली आहे. अश्यातच महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेच करणार : शिंदे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात काय घडलं ? कोर्टाने काय आदेश दिले ? जाणून घ्या

महाविकास आघाडीतील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या दोन जेष्ठ मंत्र्यांना कोरीनाची लागण झाल्याची माहिती समोर आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे दोन्ही नेते कोरोना पाॅझिटिव्ह झाले आहे. या दोन्ही नेत्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

Deepak Kesarkar letter । हिंदूत्त्वाच्या रक्षणासाठी..बंड नव्हे..शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा, दीपक केसरकरांचे पत्रातून संजय राऊतांवर गंभीर आरोप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन.माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन पवार यांनी केले आहे.

उध्दव ठाकरेंचा बंडखोर मंत्र्यांना मोठा धक्का, मंत्र्यांच्या खात्यांचे फेरवाटप, कुणाकडे कोणते खाते ? जाणून घ्या

मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळकोरोना चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की, कायम मास्क लावा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या असे अवाहन भुजबळ यांनी केले आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोना पाॅझिटिव्ह आल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक ट्विट केले आहे, त्यात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कार्यक्षम मंत्री असा लौकीक असलेले अजितदादा पवार यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. अजितदादा कोरोनाच्या संसर्गातून वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधोपचार आणि आराम घेऊन आपण लवकरात लवकर बरं व्हा, आपल्या प्रकृतीला आराम मिळो, हीच शुभेच्छा!

संजय राऊत यांना ईडीचे समन्स : राऊत म्हणतात मान कापली तरी… या मला अटक करा