संजय राऊत यांना ईडीचे समन्स : राऊत म्हणतात मान कापली तरी… या मला अटक करा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधान परिषद निकालानंतर सत्ताधारी शिवसेनेत भूकंपाचे एकामागून एक असे रोज मोठे धक्के बसत आहेत. शिवसेनेतील आठ मंत्री आणि 30 आमदारांनी बंड पुकारले आहे. मंत्री अनिल परब ईडीच्या चौकश्यांना सामोरे जात आहेत. आता शिवसेनेला हादरा देणारी आणखीन एक बातमी समोर आली आहे.

शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत आता ईडीच्या रडारवर आले आहेत. ईडीने आज संजय राऊत यांना नोटीस बजावली आहे. उद्या मंगळवारी त्यांना चौकशीला बोलावण्यात आले आहे पत्राचार जमन खरेदी प्रकरणी संजय राऊत यांची चौकशी होणार आहे याबाबत वृत्त ANI वृत्तसंस्थेने दिले आहे.

राम शिंदे विजयोत्सव : भाजपच्या वतीने अहमदनगरमध्ये जंगी कार्यक्रमाचे आयोजन !

दरम्यान समन्स येताच संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत.आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत, मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही. या.. मला अटक करा.. जय महाराष्ट्र! असे म्हणत त्यांनी ही पोस्ट देवेंद्र फडणवीस यांना टॅग केली आहे.