Rohit R R Patil | आर आर आबांचा पठ्ठ्या राज्याचं राजकारण गाजवण्यास सज्ज ; 23 वर्षीय रोहितच्या खांद्यावर येणार मोठी जबाबदारी !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | Rohit R R Patil । Rohit Pawar latest news | राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. आर आर पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आबांची निर्माण झालेली पोकळी आता भरून निघणार आहे.आर आर आबा यांचे सुपुत्र रोहित पाटील (Rohit patil) यांची राज्याच्या राजकारणात दमदार एन्ट्री झाली आहे.आबांचा हा तरणाबांड पठ्ठ्या राज्याचं राजकारण गाजवण्यास आता सज्ज झाला आहे. रोहित पाटलांमध्ये आर आर आबांची झलक पहायला मिळत आहे. त्यामुळे रोहित यांची राज्यभर चर्चा होत आहे.

सामान्य कुटुंबात जन्मलेल्या स्वर्गीय आर आर आबांचा राजकीय प्रवास उभ्या महाराष्ट्राने पाहिला.आबा महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते होते. राजकीय क्षितिजावर आबांच्या कर्तृत्वाचे दाखल नेहमी दिले जातात. आबांचा राजकीय वारसदार म्हणून रोहित पाटलांची राजकारणात दमदार एन्ट्री झाली आहे.

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटलांचे नेतृत्व सिध्द झाले.(kavathe mahankal nagar panchayat election result) जनतेने नगरपंचायत रोहित पाटलांच्या ताब्यात दिली. या निवडणुकीने तरण्याबांड रोहित पाटलांची राजकीय प्रगल्भता राज्याला दाखवून दिली. राज्यातील तरूणाईत रोहित पाटलांचीच चर्चा आहे. गावा गावात, पारावर रंगलेल्या राजकीय चर्चांमध्ये रोहित पाटील हेच नाव चर्चेत आहे.

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत (kavathe mahankal nagar panchayat election) रोहित पाटलांनी दाखवलेला राजकीय करिष्मा रोहित यांचे राजकीय बळ वाढवणारा ठरला आहे. रोहित पाटलांच्या लोकप्रियतेचा पक्षाला फायदा व्हावा याकरिता पक्षाने रोहित पाटील यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी द्यावी असा सुर उमटू लागला आहे. राज्यातील तरुणाईत रोहित पाटलांचे मोठे आकर्षण आहे.

विरोधकांची एकजूट आणि रोहित पाटलांचा धमाका

कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांनी राष्ट्रवादीकडून पॅनल निवडणुकीत उतरवले होते. या निवडणुकीत रोहित पाटील यांच्या विरोधात सर्व विरोधक एकवटले होते. या निवडणुकीत विरोधकांनी उभारलेली मजबूत तटबंदी रोहित पाटील भेटणार का ? जनता 23 वर्षाच्या तरूणाने नेतृत्व स्वीकारणार का ? याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर जनतेने रोहित पाटलांच्या नेतृत्व स्वीकारले. रोहित पाटलांच्या धडाक्याने विरोध चारीमुंड्या चीत झाले.

रोहित पाटलांच्या खांद्यावर येणार मोठी जबाबदारी?

राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत कवठे मंहाकाळ नगरपंचायतीत राजकीय करिष्मा दाखवला. ही निवडणूक ज्या पध्दतीने रोहित पाटील यांनी लढवली. ज्या पध्दतीने राजकीय भूमिका घेतल्या. त्यातून रोहित पाटील यांची राजकीय प्रगल्भता अधोरेखित झाली. राज्यात सर्वाधिक चर्चा रोहित पाटलांचीच होत आहे.

रोहित पाटील यांनी मिळवलेल्या घवघवीत, दमदार अन धडाकेबाज यशाची दखल राष्ट्रवादीकडून घेतली जाणार असून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेनुसार रोहित पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद दिले जाऊ शकते असे बोलले जात आहे.त्यादृष्टीने पक्षात खलबते सुरू आहेत.

तासगाव – कवठेमहांकाळचा पुढील आमदार

अगामी विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील हे विधानसभेचे उमेदवार असणार आहेत. त्यांच्या निवडणुकीची रंगीत तालीम मतदारसंघात सुरू झाली आहे. सांगली जिल्ह्यासह राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी रोहित पाटील या लोकप्रिय चेहर्‍याचा पक्षाला फायदा होऊ शकतो. त्यादृष्टीनेच पक्षाकडून रोहित पाटील यांना ताकद देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 25 व्या वर्षी रोहित पाटील राष्ट्रवादीचे सर्वात तरूण आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत दाखल होण्यास सज्ज झाले आहेत. त्यासाठी सर्व तयारी सुरू आहे. मतदारसंघातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.हे नगरपंचायत निवडणुकीत सिध्द झाले आहे.

एकाच जिल्ह्यात दोन पदे ?

जलसंपदामंत्री जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पाटील ज्या सांगली जिल्ह्यातून येतात त्याच जिल्ह्यातील रोहित पाटील यांच्याकडे युवक प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा आहे. एकाच जिल्ह्यात पक्षाचे दोन्ही महत्वाचे पदे पक्षाकडून दिली जाणार का ? जर असा निर्णय झाला तर पक्षाविषयी राज्यात काय संदेश जाईल ? पक्षाला सामाजिक अन प्रादेशिक समतोल साधण्याचाही विचार करावा लागेल तसा विचार पक्षाकडून होईल का? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

रोहित पाटलांकडे कोणती जबाबदारी येणार ?

राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्या खांद्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवली जाणार अशी चर्चा आहे. पक्ष नेमकी कोणती जबाबदारी देणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.