HSC SSC Exam Date 2022 | इयत्ता दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधीपासून परीक्षा सुरु होणार ?

जामखेड टाईम्स वृत्तसेवा। HSC SSC Exam Date 2022 |  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. (HSC SSC Exam Date 2022, Class X, XII practical exam schedule announced, find out when the exam will start?)

मंडळाकडून यापुर्वीच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर आता प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे. दहावीची प्रात्यक्षिक परिक्षा 25 फेब्रुवारीला तर बारावी आणि व्यवसाय अभ्यासक्रमाची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

लेखी परीक्षांच्या तारखा मंडळाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या काळात होईल. तर बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च 2022 या कालावधीत होणार आहे.व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च 2022 या कालावधीत होणार आहे.

मंडळाकडून प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीत होईल.बारावी आणि व्यावसाय अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत होईल.

परीक्षेसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ठरलेल्या मुदतीत प्रवेशपत्र देण्यात येणार आहेत. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना राज्य मंडळाकडून विभागीय मंडळाला देण्यात आल्या आहेत.