वाढदिवसाच्या अनाठायी खर्चाला फाटा देत केली गरजू रुग्णाला आर्थिक मदत, राष्ट्रवादीचे युवा नेते अशोक पठाडे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । सध्या मोठ्या धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याचे फॅड तरुणाईत आहे. वाढदिवस म्हटलं की, राडा, पार्ट्या आणि धांगडधिंगा हा आलाच. त्यात अनावश्यक गोष्टींवर नाहक होणारा पैश्यांचा चुराडा हा ठरलेलाच असे असलेले तरी, वाढदिवसाच्या नावाखाली निर्माण झालेल्या नव्या संस्कृतीला छेद देण्याच्या घटना अधून मधून समाजात घडत असतात, यातून मानवता आणि सामाजिक जाणिवेचं दर्शन घडतं. अश्याच प्रकारची सामाजिक बांधिलकी जपली गेल्याचे उदाहरण जामखेड तालुक्यातील जवळा या गावातून आज समोर आले आहे.

NCP's youth leader Ashok Pathade maintained his social commitment by providing financial assistance to needy patient by tearing apart unnecessary expenses of his birthday

अनिल शिवाजी धोत्रे हा अतिशय गरीब परिस्थितीतील युवक असून किडनी विकाराने त्रस्त आहे.घरची परिस्थिती हलाखीच्या असल्यामुळे मी माझ्या वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांना छोटीशी मदत केली. त्याच्या उपचाराचा खर्च लाखोंच्या घरात आहे  सर्वांनी आर्थिक मदतीसाठी पुढे येण्याचे आवश्यकता. सर्वांनी अनिल धोत्रे यांना आर्थिक मदत करावी ही विनंती - अशोक पठाडे, राष्ट्रवादी काँग्रेस, जवळा
http://Jamkhed Times. https://news.google.com/s/CBIwqPqByYYB?sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=11&oc=1

जामखेड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या जवळा गावातील बहुजन चळवळीचा बुलंद आवाज असलेल्या अशोक पठाडे या युवा कार्यकर्त्याने वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून गंभीर आजारी असलेल्या एका रुग्णाला भरीव आर्थिक मदत केली आहे. पठाडे यांनी आपला वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला. यातून पठाडे यांनी तरुणांपुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

सध्या तरुणाईकडून वाढदिवसाच्या नावाखाली मोठे इव्हेंट केले जातात. पैश्यांची उधळपट्टी केली जाते. या सर्व गोष्टींना फाटा देण्याची गरज आहे. परंतू समाजात बोटावर मोजण्या इतकेच लोक वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपताना दिसतात.आमदार रोहित पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या अशोक पठाडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एका रुग्णाला उपचारासाठी आर्थिक मदत करत आपला वाढदिवस साजरा केला.

जवळा येथील अनिल धोत्रे हा 36 वर्षीय युवक गेल्या काही दिवसांपासून किडनी या आजाराने त्रस्त आहे. त्याची घरची आर्थिक जेमतेम आहे. आजारपणावर होणारा खर्च या कुटुंबाच्या अवाक्याबाहेर आहे.अश्या परिस्थितीत उपचाराचा खर्च भागवायचा कसा असा मोठा प्रश्न धोत्रे कुटुंबापुढे असतानाच जवळा गावातील राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते अशोक पठाडे हे त्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. पठाडे यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत 7 हजार रूपयांची आर्थिक मदत धोत्रे कुटुंबांला केली.

अशोक पठाडे हे सुधारणावादी बहुजन चळवळीत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक असलेले पठाडे हे सामाजिक चळवळीतील बुलंद आवाज म्हणून जामखेड तालुक्यात ओळखले जातात. ते गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रीय आहेत. आमदार रोहित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे.

समाजिक हिताचे विविध सामाजिक उपक्रम अशोक पठाडे हे नेहमी राबवत आले आहेत. गोरगरीब, वंचित, उपेक्षित, शेतकरी, कष्टकरी, दिन दलितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या अशोक पठाडे या युवा कार्यकर्त्यांकडून वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णाला आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. पठाडे यांच्या या उपक्रमाचे जामखेड तालुक्यातून कौतुक केले जात आहे.

धोत्रे यांच्या मदतीसाठी पुढे या

अनिल शिवाजी धोत्रे हा अतिशय गरीब परिस्थितीतील युवक असून किडनी विकाराने त्रस्त आहे.घरची परिस्थिती हलाखीच्या असल्यामुळे मी माझ्या वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांना छोटीशी मदत केली. त्याच्या उपचाराचा खर्च लाखोंच्या घरात आहे सर्वांनी आर्थिक मदतीसाठी पुढे येण्याचे आवश्यकता. सर्वांनी अनिल धोत्रे यांना आर्थिक मदत करावी ही विनंती – अशोक पठाडे, राष्ट्रवादी काँग्रेस, जवळा