जवळा ग्रामपंचायतने घेतलेल्या निर्णयाचे रोहित पवारांनी केले कौतूक, जवळेकरांच्या सेवेत घंटागाडी दाखल, जवळ्याची वाटचाल कचरा मुक्तीच्या दिशेने !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा | सत्तार शेख | जामखेड तालुक्यातील जवळा गाव स्वच्छ सुंदर आणि कचरामुक्त करण्यासाठी युवा नेते प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच वैशाली शिंदे, उपसरपंच रोहिणी वाळूंजकर आणि ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेतला आहे.15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या घंटागाडी आणि डस्टबीनचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2022 रोजी लोकार्पण करण्यात आले.

Rohit Pawar appreciated the decision taken by javala  village panchayat, Ghanta gadi entered into the service of javala village,javala village move towards waste elimination
http://jamkhedtimes.com/

जवळा ग्रामपंचायतच्या पुढाकारातून जवळेकरांच्या सेवेत घंटागाडी दाखल झाल्यामुळे जवळ्याची वाटचाल आता कचरा मुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे.ओला व सुका कचरा संकलनासाठी ग्रामपंचायतने घंटागाडी खरेदी केली आहे. जवळा ग्रामपंचायतच्या या निर्णयाचे आमदार रोहित पवार यांनी कौतूक केले. जवळेकरांच्या सेवेत घंटागाडी दाखल झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

वाढत्या नागरीकरणामुळे कचऱ्याची समस्या मोठ्या शहरांपासून खेडेगावात येऊन पोहचली आहे. गावांमध्ये डम्पिंग ग्राऊंड नसल्याने अनेक जण मिळेल त्या ठिकाणी कचरा टाकतात. रस्त्याच्या बाजूला, तर काही ठिकाणी शेतांमध्ये कचरा टाकला जातो. काही जण घरा शेजारील उखांड्यात कचरा टाकतात त्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जामखेड तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतने पुढाकार घेतला आहे.

जवळा ग्रामपंचायतकडून सुका व ओल्या कचऱ्याचे संकलन करण्यासाठी घंटा गाडी गावात फिरवली जाणार आहे. गावातील नागरिकांनी कचरा इतरत्र न टाकता घंटागाडीत टाकवा. आपला परिसर, गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करावे असे अवाहन सरपंच वैशाली शिंदे, उपसरपंच रोहिणी वाळूंजकर, ग्रामविकास अधिकारी बबन बहीर तसेच युवा नेते प्रशांत शिंदे यांनी केले आहे.

आमदार रोहित पवार यांच्या हस्ते जवळा ग्रामपंचायतकडून राबवण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच तसेच गावात नव्याने सुरू होणाऱ्या नवीन विकास कामांचे धुमधडाक्यात भूमिपूजन करण्यात आले. पाऊस सुरू असतानाही आमदार रोहित पवार यांनी पावसाची तमा न बाळगता विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले.

यावेळी ग्रामविकास अधिकारी बबन बहीर, माजी सभापती सुभाष आव्हाड, राष्ट्रवादी युवा नेते काकासाहेब वाळुंजकर, ग्रामपंचायत सदस्य दयानंद कथले, दीपक देवमाने, नवनाथ शिंदे, कल्याण आव्हाड, दिलीप आप्पा वाळुंजकर, संदीप माने, राष्ट्रपाल आव्हाड, नय्यूम शेख राष्ट्रवादी युवा नेते दीपक पाटील,राहुल पाटील, अशोक पठाडे, ज्येष्ठ नेते भानुदास रोडे, युवा सेनाप्रमुख सावता हजारे, अमोल हजारे, पत्रकार संदेश हजारे, महावीर पोफळे, मिलिंद आव्हाड, संजय आव्हाड, महेश कथले, संदीप कोल्हे, राहुल हजारे, जीवन रोडे, पप्पु कोल्हे, लक्ष्मण होले, समीर शेख,विश्वजित हजारे, फारुक शेख, रिजवान शेख, अविनाश पठाडे, किरण रोडे, शिवदास अण्णा मासुळे सह आदी मान्यवर उपस्थित होते.

जवळा ग्रामपंचायतकडून घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प राबवला जाणार आहे. घंटागाडीच्या माध्यमांतून जमलेला सुका आणि ओल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून सेंद्रीय खत निर्मिती केली जाणार आहे. यातून पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यास मदत होणार आहे. तयार होणारे खत शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यातून ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होण्यास मदत होईल.  – प्रशांत शिंदे, सरपंच, जवळा