bjp news | कर्जतमध्ये राजकीय भूकंप : भाजपचे 03 बडे नेते राष्ट्रवादीत दाखल (bjp news political earthquake in karjat bjp leaders join ncp)

भाजपा नेते माजी मंत्री राम शिंदे यांच्या गटाला पडले मोठे भगदाड

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : bjp news political earthquake in karjat bjp leaders join ncp | कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपला जोरदार धक्के बसण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या तीन बड्या नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजप नेते माजी मंत्री राम शिंदे यांच्या गटाला मोठे भगदाड पडले आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळी अगोदरच या पक्ष प्रवेशाने भाजपाला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. (Three big BJP leaders join NCP)

माजी मंत्री राम शिंदे यांचे ऐकेकाळचे कट्टर समर्थक असलेले भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर यांच्या सह कर्जत नगरपंचायतीच्या दोन नगरसेवकांनी सोमवारी भाजपला राम राम ठोकला. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, नगरसेवक नितीन तोरडमल आणि लालासाहेब शेळके यांनी पुणे येथे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत निडणुकीपुर्वी भाजपाला मोठा धक्का दिला आहे. (bjp news political earthquake in karjat bjp leaders join ncp)

पंधरा दिवसापूर्वी भाजपा नेते प्रसाद ढोकरीकर यांनी आपल्या जिल्हा सरचिटणीस पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे सुपूर्द केला होता. भाजपाने देखील तो तात्काळ मंजुर करीत ढोकरीकर यांना पुढील मार्ग मोकळा केल्याचे सूतोवाच दिले होते. यासह मप सोसायटीचे देवा खरात यांनी देखील सोमवारी राष्ट्रवादीत प्रवेश करत स्थानिक राजकारणात खळबळ उडवून दिली होती.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार, युवकचे प्रा विशाल मेहेत्रे, विद्यार्थी आघाडीचे स्वप्नील तनपुरे, माजी सरपंच संतोष नलवडे यावेळी उपस्थित होते. आ रोहित पवार यांचे कर्जत- जामखेड मतदारसंघातील विकासकामे पाहता या विकासकामाना साथ देण्यासाठी या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती शहराध्यक्ष सुनील शेलार यांनी दिली. वरील तिन्ही भाजपाचे पदाधिकारी माजी मंत्री प्रा राम शिंदे यांचे कट्टर समर्थक होते.

कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीत इनकमिंग (bjp news political earthquake in karjat bjp leaders join ncp))

कर्जत नगरपंचायतीची मुदत मागील वर्षीच पूर्ण झाली असून कोरोना अनुषंगाने निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नाही. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. एकेकाळी माजी मंत्री प्रा राम शिंदे यांचे कट्टर समर्थक असणारे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत असल्याने यंदाची निवडणूक चुरशीची पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे. तर मागील नगरपंचायतीमध्ये शून्य खाते असणारे राष्ट्रवादी यंदा किती बाजी मारेल ? हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

News by – डाॅ अफरोज पठाण, कर्जत

web title- bjp news political earthquake in karjat bjp leaders join ncp