corona news update jamkhed | जामखेड तालुक्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक : वाचा कुठल्या गावात किती रूग्ण ?

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | corona news update jamkhed | जामखेड तालुक्यात मागील काही दिवसांपासून थंडावलेल्या कोरोनाचा (covid19india) सोमवारी मोठा उद्रेक झाला आहे. गेली काही दिवस तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या रोडावली होती. तालुका कोरोनामुक्त होणार असे चित्र असतानाच सोमवारी कोरोनाने पुन्हा एकदा मोठी मुसंडी मारली आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंतेत भर घालणारी आहे.

corona news update jamkhed | जामखेड तालुका कोरोनामुक्त कधी होणार ? हा प्रश्न अनेकांच्या मनात सतत येत असला तरी कोरोना बाधितांची वाढणारी संख्या कोरोना प्रतिबंधात्‍मक उपाययोजना कठोर करण्याच्या दिशेने इशारा करणारी ठरू लागली आहे.सोमवारी जामखेड तालुक्यात एकुण ३७ नवे कोरोना रूग्ण (covid19india) सापडले आहेत. वाढती रूग्ण संख्या मोठ्या संकटाची नांदी तर नाही ना ? ही शंका आता सामान्य जनतेच्या मनात घर करणारी ठरली आहे.

corona news update jamkhed | सोमवारी जामखेड तालुका आरोग्य विभागाने ५९० नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या यामध्ये अरणगाव ०४, जामखेड ०१, जवळके ०२,बांधखडक ०१, इतर तालुका ०१ असे ०९ जण कोरोनाबाधित (covid19india) आढळून आले आहेत.

तर RTPCR तपासणी अहवालात  जामखेड ०५, जवळा ०२, धनेगाव ०१, नाहुली ०३, हळगाव ०३, खर्डा ०२, डोणगाव ०४, सावरगाव ०३, चौंडी ०१, धोतरी ०३, रत्नापुर ०१ असे २९ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.

रॅपिड अँटीजेन व RTPCR या दोन्ही अहवालात एकुण ३७ रूग्ण आढळून आले आहेत. अचानक रूग्ण वाढ झाल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान तालुका आरोग्य विभागाने सोमवारी दिवसभरात एकुण ५१२ नागरिकांचे RTPCR स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ संजय वाघ यांनी दिली. (covid19india)