jamkhed news | मोटारसायकल चोर गजाआड, खर्डा पोलिसांची धडक कारवाई

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथून चोरीस गेलेल्या मोटार सायकलचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. मुद्देमालासह मोटारसायकल चोरास खर्डा येथून पकडण्याची ( Motorcycle thief arrested) धडक कारवाई खर्डा पोलिसांनी पार पाडली आहे. (jamkhed news, Kharda news)

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड शहरातील सदाफुलेवस्ती ( jamkhed, sadafulewasti) भागात राहणारे वसीम अन्सार शेख हे त्याचे मावसभाऊ आबेद शेख यांना खर्डा (kharda)  येथे सोडण्यासाठी २० ऑगस्ट रोजी गेले होते. रात्र झाल्याने वसीम शेख हे खर्डा येथे मुक्कामी थांबले होते. त्याच रात्री वसीम शेख यांची MH-16 CN-2729 ही मोटारसायकल आबेद शेख यांच्या घरासमोरून कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला गु.र.नं. ३३८/२०२१ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. (jamkhed news, Kharda news)

पोलिस नाईक संभाजी शेंडे , शेषराव म्हस्के हे सदर गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांना मोटारसायकल चोरी संदर्भात खबर्‍याकडून महत्वाची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आकाश शिवाजी पवार रा. खर्डा ता. जामखेड याच्या मुसक्या आवळल्या. (Motorcycle thief arrested) त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिली. व त्याने शाईन मोटारसायकल नंबर MH-16 CN-2729 ही गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली. (jamkhed news, Kharda news)

अवघ्या आठ ते दहा दिवसांच्या आत खर्डा पोलिसांनी मोटारसायकल चोरीचा छडा लावत मोटारसायकल सायकल चोराला गजाआड (Motorcycle thief arrested) करण्याची धडक कारवाई पार पाडली आहे. (jamkhed, Kharda police take major action)
ही कारवाई जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बड़े, पोलिस नाईक संभाजी शेंडे, संजय जायभाय, शेषराव म्हस्के  विष्णु म्हेत्रे यांच्या टिमने केली आहे. (jamkhed news, Kharda news)

Web title – jamkhed news Motorcycle thief arrested