नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, महाविकास आघाडीला मोठा धक्का !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । विधान परिषद निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच आज मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासंदर्भात कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अगामी विधान परिषद निवडणूकीत मतदान करण्यास परवानगी नाकारली आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडी आडचणीत सापडली आहे.

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी अगामी विधान परिषद निवडणूकीसाठी मतदान करू देण्याची परवानगी मिळावी अशी याचिका दाखल केली होती ती याचिका कोर्टाने फेटाळून लावली. मलिक आणि देशमुख हे दोन्ही नेते सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. राज्यसभा निवडणूकीत या दोन्ही नेत्यांना मतदानापासून वंचित रहावे होते, आता विधान परिषद निवडणूकीतही दोन्ही नेत्यांना वंचित रहावे लागणार आहे.