जामखेड तालुका मीडिया क्लबने निर्माण केला नवा आदर्श – पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : बातम्या दाखवणं, एखादी बातमी क्रिएट करणं तेवढाच पत्रकारांचा हेतू नाहीये. एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला विनाकारण गोत्यात आणलं जातं, वेगळ्या माध्यमांतून त्या माणसाला त्रास दिला जातो हे ज्यावेळेस निर्भीड पत्रकाराला समजतं, त्यावेळेस तो पत्रकार काय करु शकतो, तर सिंहासन चित्रपटात स्वर्गीय निळू फुले यांनी पत्रकारांची क्षमता काय असते त्याच्यामध्ये दाखवून दिलेलं आहे. अश्या पध्दतीचं पत्रकारितेचं काम जामखेड तालुका मिडीया क्लब ही संघटना खुप ताकदीने जामखेड तालुक्यात काम करेल. नवीन आदर्श निर्माण करेल. असा विश्वास पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी व्यक्त केला.

जामखेड तालुका मीडिया क्लबच्या वतीने पत्रकार आरोग्य विमा कार्यक्रमाचे आज 21 जूलै रोजी जामखेड पोस्ट ऑफीसमध्ये आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार योगेश चंद्रे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड हे होते.

यावेळी पुढे बोलताना पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड म्हणाले की, जामखेड मीडिया क्लबने पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे असे सांगत प्रशासकीय टीम तोंडदेखलं बोलत नाही, जे योग्य आहे तेच बोलावं अश्या पध्दतीचं तालुक्याचं प्रशासन आहे, जो पर्यंत जीवात जीव आहे तो पर्यंत असं वाटतं राहिल की, आमचा तालुका दुष्काळी होता पण आमच्या तालुक्यातील पत्रकारांची डोकी सुपीक होती असे आम्ही इतरांना सांगत रहावू असे प्रतिपादन गायकवाड यांनी केले.

यावेळी बोलताना तहसीलदार योगेश चंद्रे बोलताना म्हणाले की,पत्रकार व प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जनसामान्यांच्या सेवेसाठी चांगले काम करू शकतो.जामखेड तालुका मिडिया क्लबच्या माध्यमातून एक चांगले रोपटे लावले आहे. चांगला उद्देश आहे. भविष्यात पत्रकार व प्रशासन हे एकाच गाडीची दोन चाके म्हणून आपण काम करणार आहोत व जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी काम करू चांगल्या उद्देशामुळे जामखेड मिडिया क्लबचे काम आदर्श ठरेल असे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले की, पत्रकारिता छंदातून केल्यास पत्रकार वंचित समाजाला न्याय देऊ शकतो. धावपळीच्या जीवनात मीडिया क्लबच्या वतीने अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविला याबाबत सर्वांचे
कौतुक केले.

यावेळी बोलताना पोस्ट ऑफिसचे उपविभागीय अधिकारी अमित देशमुख म्हणाले की,  भारतीय डाक पुर्णपणे डिजिटल आहे. अनेक योजना पोस्ट ऑफिसच्या आहेत. आपण कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतील पैसे काढणे व टाकणे  हि कामे पोस्ट ऑफिस मध्ये करू शकतात. अनेक शिष्यवृत्ती योजनाही पोस्ट ऑफिसने सुरू केलेल्या आहेत याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा तसेच ३९९ रुपयांमध्ये दहा लाखांचा विमा या योजनेचा फायदा जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार फायकअली सय्यद, दत्तात्रय राऊत, गुलाब जांभळे, मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, उपाध्यक्ष अशोक वीर, सचिव सत्तार शेख, संपर्क प्रमुख धनराज पवार, सहसचिव पप्पूभाई सय्यद,किरण रेडे, अविनाश बोधले, अजय अवसरे, राजू भोगील यांच्या सह, पोस्ट ऑफिसचे अविनाश ओकारी, जगदीश पेनलेवाड, लक्ष्मण काठेवाड, सुनील धस, बापू कात्रजकर, राजकुमार कुलकर्णी, कालिदास कोल्हे, दादा धस, गोरख राजगुरू शाखा पोस्ट मास्तर पाटोदा, लक्ष्मण बर्डे, आजीनाथ सोले, संतोष औसरे, दत्तू तांबे, सुरेश शिंदे, सारिका मराठे, नरहरी जोशी, बाळासाहेब जगदाळे यांच्या सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.