Sujay Vikhe Patil : काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सुजय विखे पाटलांची जोरदार टीका

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : काँग्रेसने जाहीर केलेला जाहीरनामा हा केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलीली धुळफेक आहे. जनतेची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेसने हा जाहिरनामा प्रकाशित केला अशी टीका भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉ.सुजय विखे पाटील (sujay Vikhe Patil) यांनी केली.

Sujay Vikhe Patil strongly criticized the Congress manifesto, sujay Vikhe Patil latest news today, shevgaon news,

शेवगाव तालूक्यातील शिंगोरी येथे बुथ कमिटी बैठक आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विखे बोलत होते. यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांच्यासह शेवगाव तालूक्यातील सर्व भाजप पदाधिकारी,बुथ कमिटी मेंबर, गण प्रमुख आणि सुपर वॉरियर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी कॉंग्रेसच्या जाहिरनाम्याचा समाचार घेत कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. क्रॉंग्रेसने आपल्या जाहिरनाम्याचे नाव ‘न्यायपत्र’ दिले आहे. जर कॉंग्रेसला आता न्याय द्यायचा आहे, तर ५५ वर्षाच्या काळात केवळ अन्याय केला का असा सवाल डॉ. विखे यांनी यावेळी विचारला आहे.

Sujay Vikhe Patil strongly criticized the Congress manifesto, sujay Vikhe Patil latest news today, shevgaon news,

गेली अनेक दशक देशात कॉंग्रेसने देशात सत्ता उपभोगली, अनेक लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहिरनामे प्रकाशित केले. पण आजतयागत त्यांनी आपल्या जाहिरनाम्यातील एकही आश्वासन पुर्ण केले नाही असा दावा डॉ. सुजय विखे यांनी केला.केवळ निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनाचे गाजर दाखवत लोकांची फसवणूक करण्याचे काम आतापर्यंत कॉंग्रेस करत आली आहे. यामुळे यंदा काँग्रेसने जारी केलेला जाहिरनामा हा केवळ कागदापूरता मर्यादित असून पुन्हा देशाचे पंतप्रधान हे केवळ नरेंद्र मोदीच होतील, देशात केवळ मोदींची गॅरेंटी टीकू शकणार आहे. असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Sujay Vikhe Patil strongly criticized the Congress manifesto, sujay Vikhe Patil latest news today, shevgaon news,

मागील दहा वर्षाच्या काळात देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे जगात नावलौकीक मिळवला, मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे वाटचाल करत असून देशात आर्थिक सुधारणांना गती मिळत आहेत. मेक इन इंडिया,स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून उद्योजक, व्यावसायिक तयार होत आहेत. त्याच बरोबर उज्वला योजना, वयोश्री योजना, पिएम किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत,प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अशा अनेक योजनाच्या मार्फत सरकार हे शेतकरी, गोर गरीब, महिला आणि तरूणाच्या मागे खंबीर उभे आहे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे अबकी बार ४०० पार होणारच, यातून देशात नवा इतिहास घडणार असल्याचा दावा डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Sujay Vikhe Patil strongly criticized the Congress manifesto, sujay Vikhe Patil latest news today, shevgaon news,

अहमदनगर जिल्ह्यातही केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ मोठी विकास कामे झाली आहेत. यामुळे नगरची जनता सुद्धा पंतप्रधान मोदींच्याच मागे राहणार असल्याचा दावा त्यांनी व्यक्त करत केवळ विकास कामांवर सदरची निवडणूक लढवली जाणार आहे. यामुळे घराघरात मोदी सरकार आणि महायुती सरकारच्या माध्यमांतून झालेल्या कामांची माहिती पोहचवा असा संदेश त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.