2023 ला अजून काही तरी होईल अन् 2024 ला परफेक्ट कार्यक्रम करूनच दाखवणार, आमदार राम शिंदेंनी थोपटले विधानसभा निवडणुकीसाठी दंड !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रा राम शिंदे यांनी वाढदिवसाचे निमित्त साधत संपूर्ण मतदारसंघात झंझावाती दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी थेट जनतेशी संवाद साधला, जनतेने शिंदे यांना प्रचंड प्रतिसाद देत त्यांचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. गेल्या चार पाच दिवसांपासून मतदारसंघात आमदार प्रा राम शिंदे नावाचे वादळ सक्रीय झाल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले.यामुळे मतदारसंघात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश भरला गेला. राम शिंदे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात तरूण वर्गाची उपस्थित प्रचंड होती. मतदारसंघात निर्माण झालेल्या परिवर्तनाच्या लाखेच्या माध्यमांतून आमदार राम शिंदे यांनी थेट अगामी 2024 च्या विधानसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

 Something else will happen in 2023 and I will show it by making a perfect program in 2024, MLA Ram Shinde slapped fine for assembly elections

राम शिंदे हा सर्वसामान्य माणसाचा सन्मान करणारा, प्रतिष्ठा राखणारा कार्यकर्ताय, एवढा मोठ्या स्तरावर गेलो तरी, उतलो नाही, मातलो नाही, माझा सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू ठेवून कर्जत-जामखेडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रथम प्राधान्य दिलं, 2020 ला 2021 ला आपल्याला त्रास झाला, 2022 च्या निम्म्यातच आमदार झालो, 2023 ला अजून काही तरी होईल अन 2024 ला परफेक्ट कार्यक्रम करूनच दाखवीन, अशी गर्जना आमदार प्रा राम शिंदे यांनी जामखेड तालुक्यातील जवळा दौऱ्यात बोलताना केली.अगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग आमदार राम शिंदे यांनी फुंकले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अगामी निवडणूक आमदार राम शिंदे विरुद्ध आमदार रोहित पवार यांच्यातच होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

Something else will happen in 2023 and I will show it by making a perfect program in 2024, MLA Ram Shinde slapped fine for assembly elections
जाहिरात

यावेळी जवळा दौऱ्यात बोलताना आमदार राम शिंदे पुढे म्हणाले की, बायको सभापती झाली, मी आमदार झालो, पुन्हा आमदार झालो, राज्यमंत्री झालो, कॅबिनेट मंत्री झालो, पालकमंत्री झालो, तरी एवढा मोठा वाढदिवस जवळ्यात कधी साजरा झाला नाही पण आता काय होतोय; कारण अडीच वर्षाच्या काळात आपलाच गडी बरा होता, अशी आपली सर्वांची भावना झाल्यामुळे वाढदिवसाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय, नवीन वर्षाच्या स्वागताला मिळतोय, कधी नव्हे ते कर्जत-जामखेडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतायेत, त्याला इथली जनता प्रतिसाद देतेय, जनतेच्या उदंड प्रेमाची उतराई होणे या जन्मात तरी शक्य नाही, असे आमदार शिंदे म्हणाले.

जवळा गाव तर माझं आवडतं गावयं, या गावानेच मला राजकारण शिकवलं, या गावाने मला राजकारणात घडवलं, या गावाने मला राजकारणात वाढवलं, राजकारणात सगळ्यात जास्त अधिकार जर कोणाचा असेल तर तो जवळा गाव आणि पंचक्रोशीचा आहे, त्यामुळं मी कर्जत-जामखेडमध्ये एवढा मोठा निधी कोणत्याच गावात दिला नाही तेवढा जवळा गावात दिला.

आजवर जवळ्याहून बोर्ल्याला जाणाऱ्या रस्त्यावर बरचं राजकारण झालं, पण मी आलो तर आजच अधिकारी रस्ता मोजून गेलेत, अख्खा रस्ता आता डांबरीकरणाचा करणार आहे, त्यामुळे जवळावाल्यांना मागायची आवश्यकता नाही, पाहिजे तेवढं देणार, ज्यांनी मला एवढं मोठं वैभव दाखवलं त्यांना मागायची आवश्यकता नाही, तुमचचं आहे हे सगळं, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी जवळा गावावरील प्रेमाची जाहीर कबूल दिली. शिवाय जवळेकरांविषयी असलेली कृतज्ञता जाहीरपणे व्यक्त केली.

राम शिंदे कधी गप्पा मारत नाही, कधी खोटं बोलत नाही,खोटं बोलायची गरजही नाही, आपला माणूस, घरचा माणूस, हक्काचा माणूस असल्यावर कसं असतं, सगळ्यांचा सन्मान राखला जातो, पण आपल्यातून जे पळाले त्यांना सुध्दा शिवावरं सोडलं, मागं गाडी हाय का नाय ते सुध्दा विचारलं नाय, भवताली बघून कना कना चलाया लागले, ह्या त्या मोटारसायकलीला हात करायला लागले, तुम्ही इकडं मधी कुठं ? असाच आलतो असाच आलतो, असे त्यांना म्हणण्याची वेळ आली, असे म्हणत जे गडी रोहित पवारांच्या तंबूत गेलेत त्यांची पवारांनी काय अवस्था केलीय यावर भाष्य करत शिंदे यांनी टीकेचा जोरदार बार उडवून दिला.

राम शिंदे हा सर्वसामान्य माणसाचा सन्मान करणारा, प्रतिष्ठा राखणारा कार्यकर्ताय, एवढा मोठ्या स्तरावर गेलो तरी उतलो नाही, मातलो नाही, माझा सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू म्हणून या कर्जत-जामखेडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रथम प्राधान्य दिलं, 2020 ला 2021 ला आपल्याला त्रास झाला, 2022 च्या निम्म्यातच आमदार झालो, 2023 ला अजून काही तरी होईल अन 2024 ला परफेक्ट कार्यक्रम करून दाखवीन अशी गर्जना आमदार प्रा राम शिंदे यांनी जवळ्यात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात बोलताना केली.

तुमचा राम शिंदे जिगरबाजय जिगरबाज,अडीच वर्षात पुन्हा आमदार होऊन आलो, नुसता आमदार नाही झालो तर सरकार घेऊन आलो, आता कार्यकर्त्यांनी अगामी निवडणुकीसाठी सज्ज रहावे, असे अवाहन यावेळी आमदार राम शिंदे यांनी जनतेला केले. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते.