जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते, राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांचा वाढदिवस मतदारसंघात मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे.विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रमांची रेलचेल मतदारसंघात सुरू आहे.
धामणगावचे हॅटट्रिक सरपंच महारूद्र महारनवर यांच्या पुढाकारातून तब्बल 300 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आमदार राम शिंदे यांचा वाढदिवस धामणगावमध्ये मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
भाजपा कार्यकर्ते आणि शिंदे समर्थकांकडून जामखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करून आमदार राम शिंदे यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. आमदार राम शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा धामणगावचे हॅटट्रिक सरपंच महारूद्र महारनवर यांच्यावतीने धामणगाव येथील शाळेत विद्यार्थी आणि गावातील नागरिकांच्या उपस्थितीत आमदार राम शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी आमदार राम शिंदे यांना सरपंच महारूद्र महारनवर यांनी केक भरवला. आमदार राम शिंदे यांचे शाळेत आगमन होताच विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर आमदार राम शिंदे यांच्या हस्ते 300 पॅड, रजिस्टर, वही, पेन तसेेच इतर शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप शाळेतील विद्यार्थ्यांना करण्यात आले.
त्यानंतर आमदार राम शिंदे यांची धामणगावातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर संत नंदराम महाराज मंदिर येथे ग्रामस्थ आणि धामणगाव ग्रामपंचायत यांच्यावतीने आमदार राम शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच महारूद्र महारनवर, बाबासाहेब महारनवर, दिगांबर महारनवर, नितिन महारनवर, प्रभाकर महारनवर, नितिन घुमरे,विक्रम क्षीरसागर,माजी चेअरमन सतिश घुमरे, माजी सरपंच प्रभाकर महारनवर, मधुकर महारनवर, भाऊसाहेब घुमरे, हनुमान घुमरे, सुभाष काळे, नवनाथ महारनवर, भीमराव महारनवर,प्रल्हाद घुमरे, संचालक हौसराव महारनवर,संचालक नानासाहेब प्रकाश महारनवर, संचालक मिनीनाथ महारनवर, गणेश थोरात, धनेश थोरात, आबा घुमरे, संजय महारनवर, मुख्याध्यापक वाणी सर, वराट सर, लहाने सर, गायकवाड सर, काटे सर, होले सर, पांडुळे सर, गोरे मॅडम सह आदी यावेळी उपस्थित होते.