Ram Shinde BJP : आमदार प्रा.राम शिंदे यांच्या खांद्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सोपवली महत्वाची जबाबदारी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी राज्याच्या राजकारणात ओळख असलेले, माजी मंत्री, कर्जत जामखेडचे भाग्यविधाते आमदार प्रा.राम शिंदे (Ram Shinde BJP) यांच्या खांद्यावर भाजपच्या केंद्रीय व राज्य नेतृत्वाने आणखीन एक महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.गोवा व कर्नाटकची प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडल्यानंतर पक्षाने आमदार प्रा.राम शिंदे यांच्या खांद्यावर आता झारखंड राज्याच्या सह-प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे.भाजपा केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाने घेतलेला हा निर्णय पक्ष निष्ठावंताच्या कायम पाठीशी उभा आहे, हाच संदेश या निवडीतून जनतेत गेला आहे.

MLA Ram Shinde has been entrusted with the important responsibility by BJP central leadership,ram shinde responsibility of post of co-in-charge of the state of Jharkhand.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 9 वर्षे पुर्ण केली आहेत. याकाळात मोदी सरकारने राबवलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देशभरातील जनतेला व्हावी याकरिता भाजपकडून 30 मे ते 30 जून 2023 या काळात विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा व महामंत्री बी.एल. संतोष यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पक्षाने देशातील निवडक नेत्यांची राज्यनिहाय टीम बनवल्या आहेत. या टीमकडे देशातील वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपा नेत्यांचा समावेश असलेली ही टीम मोदी सरकारने 9 वर्षाच्या काळात राबवलेल्या योजनांची माहिती, तसेच पक्षाच्या ध्येय धोरणांची, नव्या योजनांची माहिती विविध कार्यक्रमांच्या माध्यमांतून जनतेला देणार आहे.भाजपने तयार केलेल्या या टीममध्ये आमदार प्रा.राम शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे, त्यांच्याकडे झारखंड राज्याच्या सह प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, तसे पत्र भाजपचे राष्ट्रीय महामंत्री तरूण चुग यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांना दिले आहे. ही टीम प्रत्येकी चार लोकसभा मतदारसंघात काम करणार आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा व महामंत्री बी.एल. संतोष यांच्या मार्गदर्शनाखाली निवडण्यात आलेल्या टीममध्ये प्रभारी, सहप्रभारी यांचा समावेश आहे.ही टीम जबाबदारी निश्चित केलेल्या लोकसभा मतदारसंघात जाऊन जनतेचा कौल जाणून घेणार आहे, सरकार राबवत असलेल्या योजनांविषयी जनतेच्या मनात नेमक्या काय भावना आहेत? हेही जाणून घेण्यात येणार आहे. स्थानिक खासदार, आमदार, इतर लोक प्रतिनिधी तसेच पक्षाचे नेते कार्यकर्त्यांशी ही टीम संवाद साधून पक्षाची स्थिती जाणून घेणार आहेत. त्यानंतर ही टीम पक्षाला अहवाल सादर करणार आहे.

मोदी सरकारला 9 वर्षे पुर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने हाती घेतलेल्या देशव्यापी अभियानाच्या प्रचार व प्रसाराच्या अत्यंत महत्वाच्या मोहिमेसाठी आमदार प्रा.राम शिंदे यांची झालेली निवड आमदार प्रा.राम शिंदे यांचे पक्षातील निर्विवाद महत्व अधोरेखित करणारे ठरत आहे. सध्या शिंदे बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी आहेत. पवारांच्या मजबुत बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी त्यांनी कंबर कसलेली आहे. याआधी आमदार शिंदे यांनी गोवाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाने कर्नाटक विधानसभा निवडणूकीचे जबाबदारी सोपवली होती. शिंदे यांनी कर्नाटकची जबाबदारी प्रामाणिक आणि अतिशय चांगल्या पध्दतीने पार पाडली. त्यामुळे आता केंद्रीय नेतृत्वाने आमदार राम शिंदे यांच्या खांद्यावर झारखंड राज्याच्या सह प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. भाजपा केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाने घेतलेला हा निर्णय पक्ष निष्ठावंताच्या पाठीशी कायम उभा आहे, हाच संदेश या निवडीतून जनतेत गेला आहे.