monsoon 2023 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सूनबाबत IMD ने दिली महत्वाची अपडेट, महाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार monsoon चे आगमन

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जून महिना उजाडला तरी महाराष्ट्रात मान्सून वारे (Monsoon winds) दाखल झाले नाहीत. मृग नक्षत्रात सुर्य दाखल झाल्यानंतर (Mrug Nakshatra) महाराष्ट्रात पावसाचे आगमन होते. मात्र, यंदा सात जूनला महाराष्ट्रात मान्सून दाखल झालेला नाही, त्यातच अरबी समुद्रात ‘बीपरजाॅय’ चक्रीवादळ (Biparjoy Hurricane) सक्रीय झाले आहे. महाराष्ट्रात मान्सून कधी येणार याच्या प्रतिक्षेत सर्वजण आहेत. मात्र मान्सूनबाबत imd ने एक महत्वाची अपडेट दिली आहे.

monsoon 2023, good news for farmers, monsoon in kerala,IMD gives important update on monsoon, arrival of monsoon in Maharashtra on 'this' date

हवामान विभागाने बुधवारी महत्वाचे अपडेट दिले होते. यामध्ये म्हटले होते की, येत्या 48 तासांत केरळमध्ये दाखल होईल, आज दुपारी 1 च्या सुमारास केरळमध्ये मान्सून (monsoon in kerala) दाखल झाला आहे. यंदा केरळमध्ये आठवडाभर उशिराने मान्सून दाखल झाला आहे. आता तो तळकोकणात अर्थात महाराष्ट्रात कधी दाखल होतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या भागात मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत. हलका ते मध्यम स्वरूपाचा हा पाऊस पडत आहे. काही वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस होते.

केरळमध्ये गुरूवारी मान्सून दाखल झाला आहे. सकाळपासून केरळच्या वेगवेगळ्या भागात पाऊस पडत आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाकडून आज दुपारी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 16 जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केरळमध्ये आठ दिवस उशीरा मान्सून दाखल झाल्याचा परिणाम आता मान्सूनच्या पुढच्या वाटचालीत होताना दिसणार आहे.

दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजानुसार 11, 12, 14, 15,16 जून या काळात महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हा पाऊस वेगवेगळ्या भागात होईल. 20 जून नंतर महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सूनचे महाराष्ट्रात उशिराने आगमन होत असल्याने शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी घाई करू नये, चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणी हाती घ्यावी. असे अवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.