आमदार राम शिंदेंनी भरला कार्यकर्त्यांमध्ये जोश, हळगावमध्ये मन की बात कार्यक्रम संपन्न !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। “सगळ्यांना वाटलं आपून काय पाच पंच्चवीस वर्षे मागं येत नाही, पण अडीच वर्षांतच परत आलो, कारण तुम्ही 94 हजार मतं दिलीत, तुमच्या 94 हजार मताची दखल पक्षाने घेतली, मी तर पुन्हा आलोच, पण सरकार पण आलं, लोकं म्हणतेत तुम्ही आले सरकार आलं, आमचं काय झालं? तुमचा सासुरवास कमी झाला, सगळ्यांचा काही ना काही फायदा होत असतो, त्यासाठी दृष्टिकोन चांगला ठेवला पाहिजे. येणारे दिवस आपले आहेत त्यामुळे काळजीचं कारण नाही असे सांगत आमदार राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.”

MLA Ram Shinde filled the activists with enthusiasm, Mann Ki Baat program in Halgaon

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे रविवारी जामखेड तालुक्यातील हळगाव येथील दादासाहेब पुराणे यांच्या वस्तीवर आयोजन करण्यात आले होते.यावेळी बुथप्रमुख, पन्नाप्रमुख, आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार राम शिंदे बोलत होते. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, उपसरपंच आबासाहेब ढवळे, पांडुरंग उबाळे, गौतम कोल्हे, दादासाहेब पुराणे, उदय पवार, उमेश रोडे, अरूण वराट सर, बापुराव ढवळे, राजेंद्र ओमासे, लहू शिंदे, भाजपा सोशल मिडीया प्रमुख उध्दव हुलगुंडे सह आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, नरेंद्र मोदी ज्या दिवसांपासून पंतप्रधान झाले, त्या दिवसापासून अखंडपणे, निरंतर, प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशवासियांच्या समोर आपल्या देशात होत असलेली प्रगती, भिन्नभिन्न राज्यांमध्ये उत्कृष्ट असलेले प्रकल्प त्याची सर्वांगीण आणि सर्वंकष माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्याच माध्यमांतून हळगावमधील बुथप्रमुख, पन्नाप्रमुख, आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मन की बात कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. 30 मिनीटे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रम ऐकला.

MLA Ram Shinde filled the activists with enthusiasm, Mann Ki Baat program in Halgaon

“शिंदे पुढे म्हणाले की, सर्वसाधारणपणे गावात एखादं पद मिळालं की घरी सांगतो की मला लै काम आहे. पण देशाच्या पंतप्रधानांनी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता देशात कुठेही असो किंवा परदेशात असो मन की बातमध्ये ते बोलतात म्हणजे बोलतात. या देशाच्या प्रति त्यांची असलेली भावना, अनेक उत्कृष्ट कामं असतील, प्रकल्प असतील याची माहिती ते देत असतात. मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमांतून आपल्या देशाचे पंतप्रधान जेव्हा आपल्याशी संवाद साधतात त्या वेळेस आपला स्वाभिमान आणि अभिमान जागृत झाल्याशिवाय राहत नाही.”

MLA Ram Shinde filled the activists with enthusiasm, Mann Ki Baat program in Halgaon

शिंदे पुढे म्हणाले की, सगळ्यांना वाटलं आपून काय पाच पंच्चवीस वर्षे  मागं येत नाही, पण अडीच वर्षांतच परत आलो, कारण तुम्ही 94 हजार मतं दिलीत, तुमच्या 94 हजार मताच्या परिणामाची दखल पक्षाने घेतली, मी तर पुन्हा आलोच, पण सरकार पण आलं, लोकं म्हणतेत तुम्ही आले सरकार आलं, आमचं काय झालं, तुमचा सासुरवास कमी झाला, सगळ्यांचा काही ना काही फायदा होत असतो, त्यासाठी दृष्टिकोन चांगला ठेवला पाहिजे. त्यामुळे सर्वांचं चांगलं होतं. त्यातूनच पुरक वातावरण बनतं. येणारे दिवस आपले आहेत त्यामुळे काळजीचं कारण नाही असे शिंदे म्हणाले.

“आपण आपलं जीवन जगत असताना निरंतर आणि सातत्याने जर पुढे गेलो, तर आपले ध्येय आणि उद्देश सहजपणे साध्य होतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या ध्येयापर्यंत आणि उद्देशापर्यंत जाण्यासाठी सातत्य ठेवणे महत्वाचं आहे. येणारे दिवस आपले आहेत त्यामुळे काळजीचं कारण नाही सर्वांनी पक्षवाढीसाठी जोमाने काम करावे.असे सांगत आमदार राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.”