रामभाऊ आणि तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कर्जतमध्ये पार पडला भव्य शेतकरी मेळावा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड ते राशीन या 250 कोटी रूपये खर्चाच्या रस्त्यासाठी अर्थसंकल्पीय पुरवणी मागणीत निधी उपलब्ध करून दिला जाईल, तसेच गोदड महाराज मंदिर परिसराच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच कर्जत जामखेड मतदारसंघात सौर फिडर योजना गतिमान करण्यासाठी जेवढी जागा उपलब्ध करून द्याल तेवढे सौर फिडर बसवले जातील अशी मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जतमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना केली.

I stand firmly with Rambhau and you - Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Fadnavis Important Announcement

आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून कर्जतमध्ये पक्ष प्रवेश सोहळा आणि भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार भिमराव धोंडे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, माजी सभापती आशाताई राम शिंदे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, सह आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

I stand firmly with Rambhau and you - Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Fadnavis Important Announcement

दरम्यान यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार प्रा राम शिंदे, खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या उपस्थितीत माजी जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेसचे निष्ठावंत नेते प्रविण घुले पाटलांनी आपल्या हजारो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. तसेच कर्जत जामखेड मतदारसंघातील अनेक गावांच्या सरपंचांनी तसेच आजी माजी पदाधिकाऱ्यांनी यावेळी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

I stand firmly with Rambhau and you - Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Fadnavis Important Announcement

भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्यांचा पक्षय, सामान्य कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व या पक्षामध्ये काम करतं, आणि म्हणूनच रामभाऊ शिंदेंसारखा एक प्राध्यापक जो जनसामान्यातनं उभा राहिला आणि राज्याच्या मंत्रीपदापर्यंत पोहचला हे भारतीय जनता पक्षांमध्येच होऊ शकतं, असे म्हणत रामभाऊ आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या पाठीशी मी सदैव उभा आहे, मतदारसंघाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासून देणार नाही, असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिला.

I stand firmly with Rambhau and you - Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Fadnavis Important Announcement

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, आज कर्जत-जामखेड मतदारसंघातील ज्या कामांचे लोकार्पण माझ्या हस्ते झालं, मला या ठिकाणी हे नमुद केले पाहिजे की, हे सर्व प्रकल्प,रामभाऊ जेव्हा पालकमंत्री होते, तेव्हा त्याची आम्ही सुरूवात केली होती. ईश्वराची आणि गोदड महाराजांची कृपा बघा, मध्यंतरी सरकार बदललं पण काम पुर्ण झालं नाही, आम्ही उद्घाटनाला यावं अशीच कामाची इच्छा होती आणि म्हणून आज पुन्हा एकदा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि रामभाऊ सोबत आपण विविध कामांचे लोकार्पण केले, असे म्हणत फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला.

I stand firmly with Rambhau and you - Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Fadnavis Important Announcement

फडणवीस पुढे म्हणाले की, खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांच्या आशिर्वादानं भाजपा – शिवसेना महायुतीचे सरकार आलयं, एकनाथरावजी शिंदे आपले मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये परवाच आपण राज्याच्या अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर समाजातल्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन, दिन दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, महिला, ओबीसी, तरूण, अल्पसंख्यांक, सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविण्याचं काम या अर्थसंकल्पाच्या माध्यमांतून आपण केलं असे यावेळी फडणवीस यांनी नमुद केले.

I stand firmly with Rambhau and you - Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Fadnavis Important Announcement

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, अर्थव्यवस्थेमध्ये आमचा केंद्रबिंदू शेतकरी आहे. शेतकऱ्यांवर सातत्याने संकटं येतात. अनेकवेळा कधी अतिवृष्टी होते, कधी अवर्षण होतं, कधी अवकाळीमुळे उभी पिके नष्ट होतात, आपलं सरकार आल्यानंतर आपण शेतकऱ्यांवर अवकाळी पावसामुळे जी अडचण आली होती ती दुर करण्यासाठी 7 हजार कोटी रूपये मदत म्हणुन दिली होती.

I stand firmly with Rambhau and you - Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Fadnavis Important Announcement

फडणवीस पुढे म्हणाले की, कधी कधी असं म्हणतात ना लबाडाचं आवतण जेवल्याशिवाय खरं नाही, मागच्या सरकारने ज्यांनी वेळेवर कर्ज भरलं त्यांच्या खात्यामध्ये 50 हजार रूपये देऊ अशी दोनदा बजेटमध्ये घोषणा केली. पण फुटकी कवडी दिली नाही, पण आपलं सरकार आल्यानंतर साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50-50 हजार रूपये आपण त्याठिकाणी दिले. साडेचार हजार कोटी रूपये दिले, अजून अडीच लाख शेतकरी बाकी आहेत, त्यासाठी एक हजार कोटींची तरतुद केली आहे, त्यांच्याही खात्यामध्ये आपण ते पैसे देतो आहोत. केवळ सात महिन्यांमध्ये 12 हजार कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले, असे सांगत फडणवीस यांनी सरकारकडून शेतकऱ्यांना करण्यात येत असलेल्या मदतीचा पाढा वाचला.

I stand firmly with Rambhau and you - Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Fadnavis Important Announcement

सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प शेतकऱ्यांमध्ये परिवर्तन घडविणारा अर्थसंकल्प आहे. किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यसरकारने नमो शेतकरी महा सन्मान योजना आणलीय, केंद्र सरकारच्या 6 हजार रूपयांबरोबर महाराष्ट्र सरकारही 6 हजार रूपये राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे, असे सांगताच उपस्थित शेतकऱ्यांनी फडणवीस यांच्या भाषणाला जोरदार दाद दिली.

रामभाऊ तुमचं कामचं वेगळयं…

इतर पक्षाच्या कार्यक्रमामध्ये समोर जितके लोकं बसलेले असतात तितके लोकं तुम्ही मंचावर बसवले आहेत. मी जर उलट झालो तर एक सभा इकडे देखील घेता येईल असे फडणवीस म्हणताच उपस्थितांनी जोरदार दाद दिली.

I stand firmly with Rambhau and you - Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Fadnavis Important Announcement