जामखेड तालुक्यातील या कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये जाहीर प्रवेश

भाजपच्या इनकमिंग मोहिमेमुळे आमदार प्रा.राम शिंदेंची राजकीय ताकद वाढली

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । कर्जत-जामखेड मतदारसंघात शनिवारचा दिवस राजकीय भूकंप घडविणारा ठरला. कर्जत तालुक्यातील बडे राजकीय प्रस्थ अशी ओळख असलेले काँग्रेसचे नेते प्रविण घुले पाटलांच्या भाजपा प्रवेशामुळे कर्जत तालुक्यात खळबळ उडालेली असतानाच जामखेड तालुक्यातील अनेक सरपंचांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करत जामखेड तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.

These activists from Jamkhed taluka publicly joined the BJP, due to the incoming campaign of the BJP, MLA Prof. Ram Shinde's political strength increased.

शनिवारी कर्जतमध्ये आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून विविध राजकीय पक्षातील आजी – माजी पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश घडवून आणण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या इनकमिंग मोहिमेमुळे मतदारसंघात भाजपने जोरदार हवा निर्माण केली आहे. भाजपने शनिवारी घेतलेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमामुळे आमदार प्रा.राम शिंदे यांची राजकीय ताकद वाढली आहे.

शनिवारी पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात कर्जत काँग्रेसचे वजनदार नेते प्रविण घुले पाटील यांनी आपल्या हजारो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. यावेळी जामखेड तालुक्यातून काँग्रेसचे जामखेड शहराध्यक्ष जमीरभाई सय्यद, राष्ट्रवादीचे युवा नेते राहूल वाळूंजकर, राष्ट्रवादीचे युवा नेते सचिन घुमरे (सरपंच नाहूली, माजी नगरसेवक अशोक शेळके यांनीही यावेळी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश केला.

भाजपात प्रवेश केलेल्या जामखेड तालुक्यातील कार्यकर्त्यांची नावं खालीलप्रमाणे 

अशोक शेळके (माजी नगरसेवक) जमिर बारुद सय्यद (कांग्रेस शहर अध्यक्ष) रवींद्र डाडर (अध्यक्ष आण्णा भाऊ साठे प्रतिष्ठान जामखेड) सचिन घुमरे (सरपंच नाहुली) बाबु बहीर (माजी सरपंच) धनंजय कुमटकर (सरपंच राजेवाडी) सिताराम कांबळे (सरपंच कवडगाव) चंद्रकात उगले (सरपंच नायगाव) बाबासाहेब शिंदे (सरपंच धानोरा) रावसाहेब मारकड (सरपंच आघी ), विक्रम गोरे सर (उपसरपंच राजेवाडी ) लक्ष्मण पागिरे (उपसरपंच मतेवाडी ) नानासाहेब खाडे (उपसरपंच राजुरी) राहुल वाळुंजकर जवळा, महादेव राऊत मेजर (चेअरमन वि. का. से. सोसायटी कवडगाव) अविनाश पिंपळे (व्हा. चेअरमन वि.का.से.सोसायटी धानोरा, संजय खाडे ( ग्रा.पं. सदस्य राजुरी ) पिंटु घुले ( ग्रा.पं.सदस्य राजुरी) अक्षय मोहन कुमटकर ( ग्रा.पं.सदस्य राजेवाडी) भाऊ ढेपे ( ग्रा.पं. सदस्य राजेवाडी), किरण गोरे (ग्रा.पं. सदस्य राजेवाडी)दत्ता दळवी (ग्रा.पं.सदस्य राजेवाडी) नवनाथ गोरे (ग्रा. पं. सदस्य राजेवाडी) सतिश भोसले (ग्रा.पं.सदस्य खांडवी ) प्रकाश जायभाय (ग्रा.पं.स. वंजारवाडी / धानोरा), गोकुळ मिसाळ (ग्रा.पं.स. वंजारवाडी / धानोरा ), पंकज तुपेरे (ग्रा.पं.स. वंजारवाडी / धानोरा ) सिद्धार्थ थोरात माजी सरपंच पाटोदा, शेखर मोरे (जामखेड) बबन बोबडे ग्रा.पं. सदस्य पिंपळगाव आळवा, भारत बारवकर, ग्रामपंचायत सदस्य – लक्ष्मण युवराज गटाप,नारायण माणिक भोरे, कोंडीबा चोरखले -संचालक, हरिचंद्र भोईटे- संचालक, बबन खोसे संचालक यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

भाजपने कर्जत जामखेड मतदारसंघात हाती घेतलेल्या इनकमिंग मोहिमेत अनेक गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन आणि संचालकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.