Breaking : अहमदनगर जिल्हा बँकेत सत्तांतर, महाविकास आघाडीचा पराभव, भाजपचा दणदणीत विजय, कर्डिले अध्यक्षपदी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला धोबीपछाड देत बँकेवर कब्जा मिळवला आहे. भाजपच्या या विजयामुळे महाविकास आघाडी अर्थात राष्ट्रवादीला जोर का झटका बसला आहे.

Change of power in Ahmednagar district bank, defeat of Mahavikas Aghadi, resounding victory of BJP, Kardile becomes president

अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली. भाजपकडून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले तर महाविकास आघाडीकडून चंद्रशेखर घुले अशी लढत झाली. यात कर्डिले हे विजयी झाले. कर्डिले यांना 10 तर घुले यांना 9 मते मिळाली. तर एक मत बाद झाले. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या विजयामुळे बँक भाजपच्या ताब्यात गेली आहे.