bjp MLA Jayakumar Gore controversial statement | वादग्रस्त वक्तव्यामुळेआमदार जयकुमार गोरे आले अडचणीत : भाजपवर शिवसेना भडकली

आमदार गोरे म्हणाले, माझ्याकडे भाऊ नसतानाही मी जिंकलो आहे. कारण रामाची नियत खराब होती

 

जामखेड टाईम्स टाईम्स  : bjp MLA Jayakumar Gore controversial statement | भाजपमध्ये वाचाळवीर नेत्यांची काही कमी नाही. रोज भाजपचा कोणता ना कोणता नेता वादग्रस्त वक्तव्य केल्याशिवाय गप्प बसत नाही. वादग्रस्त वक्तव्य करण्याचे पेटंटच जणू भाजपच्या काही तथाकथित वाचाळवीरांना बहालच करण्यात आलेय की काय असेच आता अधोरेखित होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्याने आधीच भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे अडचणीत सापडलेले असतानाच आता भाजपचा एक आमदार वादग्रस्त वक्तव्यामुळे भलताच अडचणीत सापडला आहे. या आमदाराच्या वक्तव्यामुळे शिवसेना भाजपवर आता भलतीच भडकली आहे.

 जयकुमार गोरे यांनी भगवान प्रभू रामचंद्रांचा अपमान करणारं वक्तव्य भर सभेत केले आहे.या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार वायरल झाला आहे. (bjp MLA Jayakumar Gore controversial statement)

प्रभू रामचंद्रांविषयी काय म्हणाले आमदार गोरे ?

सातारा (satara)  जिल्ह्यातील वडूजच्या सातेवाडी ( satewadi, vaduj) येथील कार्यक्रमात आमदार जयकुमार गोरे (mla jaykumar gore) बोलताना म्हणाले की, रामायणात लढाईत रामाने रावणाला हरवले. रावण अखेरच्या घटका मोजत होता. तेव्हा रावणाने रामाला विचारले, माझ्याकडे एवढी सेना आहे. एवढी ताकद आहे. एवढे राक्षस आहेत. तुझ्याकडे तर फक्त वानरे आहेत. तरीही तू जिंकलास कसा? त्यावर राम म्हणाला, माझ्याकडे तुझा भाऊ बिभीषण होता. म्हणून लढाई जिंकलो.

यानंतर आमदार गोरे म्हणाले, माझ्याकडे तर भाऊ नसतानाही मी जिंकलो आहे. कारण रामाची नियत खराब होती असं विधान त्यांनी दोनदा म्हटलं. त्यावर उपस्थितांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर रामाची नव्हे रावणाची नियत खराब होती अशी दुरुस्ती केली. जयकुमार गोरे यांनी अनावधानाने ही चूक केली असली तरी सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड गाजत आहे. अनेकजण या विधानाची खिल्ली उडवत आहेत. (bjp MLA Jayakumar Gore controversial statement)

सातारच्या माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी प्रभू रामचंद्राबाबत केलेल्या विधानावरुन भलतेच गोत्यात सापडले आहेत. जयकुमार गोरे यांनी केलेल्या विधानामुळे भाजपाची पुरती गोची झाली मात्र शिवसेनेच्या हाती आयते कोलीत मिळाल्याने शिवसेनेने भाजपवर टिकेचा जोरदार आसूड उगारला आहे. (bjp MLA Jayakumar Gore controversial statement)

प्रभू रामचंद्रांचा अनादर म्हणजेच भारतीय संस्कृतीचा अपमान  – आमदार मनिषा कायंदे

भगवान प्रभू रामचंद्रांचा भर सभेत अपमान करणारे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा शिवसेना पक्षाने जाहीर निषेध केला असून भाजपच्या सर्व आमदारांना रामायण ग्रथांचे पठण करण्याची गरज असल्याचे मत शिवसेना प्रवक्त्या व आमदार डॉ. मनीषा कायंदे (Shiv Sena spokesperson and MLA Dr. Manisha Kayande) यांनी व्यक्त केले आहे. रामायण – महाभारत हे हिंदूंचे पवित्र ग्रंथ असून त्याची कोणतीही बदनामी आम्ही सहन करणार नाही असा इशाराही डॉ मनीषा कायंदे यांनी दिला आहे. (bjp MLA Jayakumar Gore controversial statement)

bjp MLA Jayakumar Gore controversial statement |
भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना मनीषा कायंदे यांनी पोस्टाद्वारे रामायण ग्रंथाची एक प्रत पाठवली.

प्रभू रामचंद्रांचा अनादर म्हणजेच भारतीय संस्कृतीचा अपमान आहे, जर तुम्हाला रामायण अथवा महाभारतातील संदर्भ माहीत नसतील तर ते ग्रंथ वाचण्याची खूप गरज आहे. ऐकिव माहितीवर आपले चुकीचे ज्ञान देऊन महापुरुषांचा अपमान करू नये. ”

आता कुठे लपले “मी असतो तर” ब्रँडेड खासदार ?

मी असतो तर ” ब्रँडेड कोकणचे खासदार आता गोरे यांच्या श्रीमुखात लावणार का ? असा सवालही डॉ मनीषा कायंदे यांनी केला आहे. प्रभू श्रीराम -रावण बिभीषण हे रामायणात होते का महाभारतात हे माहित नसलेले भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना मनीषा कायंदे यांनी पोस्टाद्वारे रामायण ग्रंथाची एक प्रत पाठविली आहे. (bjp MLA Jayakumar Gore controversial statement)

वाचाळवीर  नेत्यांना किती दिवस महाराष्ट्र पाठीशी  घालणार

एखाद्या जबाबदार व्यक्तीने सार्वजनिक मंचावरून बोलताना भान संभाळून बोलले पाहिजे परंतू वाचाळवीर नेते रोजच वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. सर्वच पक्षांत वाचाळवीरांचा भरणा आहे. परंतु भाजपच्या गोटातील वाचाळवीर मात्र रोज आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी महाराष्ट्राचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक वातावरण बिघडवण्याचे उद्योग करत आहेत. अश्या वाचाळवीरांना महाराष्ट्रातील जनता अजुन किती दिवस पाठीशी घालणार आहे ? हा खरा प्रश्न आहे. वाचाळवीर नेत्यांना योग्यवेळी धडा न शिकवल्यास हे वाचाळवीर नेते असेच सोकावत राहतील. यातून महाराष्ट्राचे वातावरण कायम दुषित राहिल. त्यामुळे आता कुठल्याही राजकीय पक्षातील वाचाळवीर नेता, पुढारी अथवा कार्यकर्ता असो त्याला जनतेने योग्य धडा शिकवण्याची आवश्यकता आहे.