corona update jamkhed news | बुधवारी पुन्हा झाली रुग्णांमध्ये वाढ : वाचा जामखेड तालुक्यातील कुठल्या गावात किती रूग्ण ?
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : corona update jamkhed news |जामखेड तालुक्यात कोरोना पुरता ठाण मांडून बसलाय. मंगळवारी जामखेड तालुक्यात कोरोनाची रूग्णसंख्या मंदावली होती. परंतु बुधवारी कोरोनाने पुन्हा वेग पकडला आहे.
जामखेड तालुका आरोग्य विभागाने बुधवारी दिवसभरात ६१९ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या. त्यामध्ये जामखेड ०१, गोयकरवाडी ०१, साकत १ व इतर तालुका ०१ असे ०४ रूग्ण आढळून आले.
तसेच RTPCR अहवालात जामखेड ०३, हळगाव ०३, शिऊर ०५, धनेगाव ०१, नान्नज ०१, खुरदैठण ०१, धोतरी ०२, कुसडगाव ०१, पिंपरखेड ०२ असे १९ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.
बुधवारी दिवसभरात जामखेड तालुक्यात एकुण २२ नवे कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत.
आरोग्य विभागाने बुधवार दिवस अखेर एकुण ४४० नागरिकांचे स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ यांनी बुधवारी सायंकाळी दिली.
web title: corona update jamkhed news